राहाता तालुक्यात 158 करोनाबाधित रुग्ण

603 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह; 94 जणांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 158 करोनाबाधित रुग्ण

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात काल 158 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होऊन घरी जाणार्‍यांची संख्या 94 वर जाऊन पोहोचली आहे. तर 603 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 19221 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 18524 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज 603 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत.

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 28, खासगी रुग्णालयात 94 तर अँटीजेन चाचणीत 36 रुग्ण आढळून आले आहेत. तर 94 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राहाता तालुक्यातील अस्तगाव-01, राजुरी-01, पिंपरी निर्मळ -02, रांजणगाव-01, दाढबुद्रुक-05, हसनापूर-01, चंद्रापूर-01, लोणी बुद्रुक-18, गोगलगाव-03, लोणी खुर्द-10, नांदुर्खी बुदुक-07, कोर्‍हाळे-04, केलवड बुद्रुक-07, केसलवड खुर्द -06, साकुरी-03, दहेगाव-02, खडकेवाके-03, पिंपरी लौकाई-01 कोल्हार-14, भगवतीपूर-05, बाभळेश्वर बुद्रुक-07, लोहगाव-01, रुई-01, शिंगवे-01, वाकडी-03, जळगाव-03, धनगरवाडी- 01, चितळई-01, पुणतांबा-16रस्तापूर-01, रांजणखोल-02, नांदूर बुद्रुक-01, रामपूरवाडी-02 असे एकूण 135, शिर्डी-10, राहाता-09, बाहेरील तालुक्यातील 04 असे एकूण 158 रुग्ण आढळून आले आहे.

काल राहाता तालुक्यात करोनाबाधितांची संख्या काल पुन्हा वाढली आहे. परवा 82 करोनाबाधित रुग्ण आढळून आले होते तर काल 158 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्याच दरम्यान करोनातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 94 वर जाऊन पोहोचले आहे. सध्या तालुक्यात केवळ 603 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com