राहाता तालुक्यात 97 जणांना डिस्चार्ज

539 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह; 82 नवीन करोनाबाधित
राहाता तालुक्यात 97 जणांना डिस्चार्ज

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात काल 82 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होऊन घरी जाणार्‍यांची संख्या 97 वर जाऊन पोहोचली आहे. तर 539 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 19063 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 18430 रुग्ण बरे होऊन घरी गेले. 539 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत.

जिल्हा रुग्णालयात 38, खासगी रुग्णालयात 20 तर अँटीजेन चाचणीत 24 रुग्ण आढळून आले आहेत. तर 97 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राहाता तालुक्यातील अस्तगाव-01, चोळकेवाडी-01, राजुरी-03, पिंपरी निर्मळ -01, एकरुखे-01, दाढबुद्रुक-01, दुर्गापूर-01, लोणी बुद्रुक-12, गोगलगाव-05, लोणी खुर्द-08, नांदुर्खी बुदु्रक-01, साकुरी-01, खडकेवाके-01, कोल्हार-05, भगवतीपूर-01, बाभळेश्वर बुद्रुक-04, लोहगाव-02, सावळीविहिर खुर्द-02, निघोज-02, रुई-01, पुणतांबा-09, रांजणखोल-01, नांदूर बुद्रुक-02, नपावाडी-01, असे एकूण 73, शिर्डी-01, राहाता-05, बाहेरील तालुक्यातील 04 असे एकूण 82 रुग्ण आढळून आले आहेत.

काल राहाता तालुक्यात करोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने तालुक्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परवा 91 करोनाबाधित रुग्ण आढळून आले होते तर काल 82 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्याच दरम्यान करोनातून बरे होऊन घरी गेलल्यांची संख्या 97 वर जावून पोहोचल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. सध्या तालुक्यात केवळ 539 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com