राहाता तालुक्यात 98 करोनाबाधित रुग्ण

895 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह;154 जणांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 98 करोनाबाधित रुग्ण
COVID-19

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात काल 98 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होवून घरी जाणार्‍यांची संख्या 154 वर जावून पोहोचली आहे. तर 895 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 18381 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 17163 रुग्ण बरे होवून घरी गेले. ,आज 895 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत.

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 04 खासगी रुग्णालयात 30 तर अँटीजन चाचणीत 64 रुग्ण आढळून आले आहेत. तर 154 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

काल राहाता तालुक्यात करोनाबाधितांची संख्या कमी होवून तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. काल 98 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होवून घरी जाणार्‍यांचे प्रमाण दुपटीने आहे. सध्या तालुक्यात 895 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com