राहाता तालुक्यात 162 करोनाबाधित

1168 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह; 295 जणांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 162 करोनाबाधित

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात काल 162 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होऊन घरी जाणार्‍यांची संख्या 295 वर जाऊन पोहोचली आहे. तर 1168 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 18183 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1692 रुग्ण बरे होऊन घरी गेले. ,आज 1168 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 02 खासगी रुग्णालयात 90 तर अँटीजेन चाचणीत 70 रुग्ण आढळून आले आहेत. तर 295 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

तालुक्यात अस्तगाव-02, ममदापूर-02, पिंपरी निर्मळ-03, एकरुखे-09, रांजणगाव-02, दुर्गापूर-03, लोणी बुद्रुक-17, गोगलगाव-03, लोणी खुर्द-17, नांदुर्खी बुद्रुक-01, कोर्‍हाळे-01, केलवड बुदुक-04, साकुरी-02, पिंपळस-02, पिंपरी लौकाई-02, कोल्हार-16, भगवतीपूर-07, बाभळेश्वर बुद्रुक - 03, पाथरे-01, हनुमंतगाव-01, लोहगाव-02, सावळीविहिर बुदुक-11, सावळीविहिर खुर्द-01, निघोज -05, रुई-01, पिंपळवाडी-03, चितळी-01, पुणतांबा-08, रस्तापूर-02, रांजणखोल-01, रामपूरवाडी-01, नपावाडी-01, असे ग्रामीण 138 रुग्ण, शिर्डी-09, राहाता-08, बाहेरील तालुक्यातील 7 असे एकूण 162 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

काल राहाता तालुक्यात करोनाबाधितांची संख्या कमी होऊन बरे होऊन घरी जाणार्‍यांचे प्रमाण दुपटीने आहे. सध्या तालुक्यात 1168 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com