राहाता तालुक्यात 213 करोनाबाधितांची भर

1301 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह; 233 जणांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 213 करोनाबाधितांची भर
Corona

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात काल पुन्हा करोनाने आपला आलेख कायम ठेवला असून काल 213 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होऊन घरी जाणार्‍यांचे प्रमाण 233 इतके आहे.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 18021 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 16607 रुग्ण बरे होऊन घरी गेले. ,आज 1301 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत.

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 00 खासगी रुग्णालयात 149 तर अँटीजन चाचणीत 64 रुग्ण आढळून आले आहेत. तर 233 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

तालुक्यात अस्तगाव-05, राजुरी-01, पिंपरी निर्मळ-01, एकरुखे-07, रांजणगाव-03, दाढ बुद्रुक-02, दुर्गापूर-02, लोणी बुद्रुक-29, गोगलगाव-09, लोणी खुर्द-12, डोर्‍हाळे-03, नांदुर्खीबुद्रुक-05, नांदुर्खी खुर्द-05, केलवड बुदुक-13, साकुरी-03, दहेगाव-01, खडकेवाके-01, आडगाव बुदुक-01, कोल्हार-08, बाभळेश्वर बुद्रुक - 01, हनुमंतगाव-03, निमगाव-01, निघोज -03, पिंपळवाडी-03,वाकडी-14, जळगाव-09, धनगरवाडी-01, एलमवाडी-04, चितळी-02, पुणतांबा-21, रांजणखोल-03, नांदूर खुर्द -01, नपावाडी-01, असे ग्रामीण 179 रुग्ण, शिर्डी-11, राहाता-16, बाहेरील तालुक्यातील 7 असे एकूण 213 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

राहाता तालुक्यात करोनाबाधितांची संख्या कमी होत नसल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. सध्या तालुक्यात 1301 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र उपचार घेवून बरे झालेल्यांची संख्या चांगली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com