राहाता तालुक्यात नवीन 281 करोनाबाधित

चितळी, लोणी खुर्द-23, शिर्डी-24, पुणतांबा-17
राहाता तालुक्यात नवीन 281 करोनाबाधित

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात काल पुन्हा करोनाने आपला चढता आलेख कायम ठेवला असून काल 281 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होवून घरी जाणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे.

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 27 खासगी रुग्णालयात 218 तर अँटीजन चाचणीत 36 रग्ण आढळून आले आहेत. तर 301 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तालुक्यात अस्तगाव-13 राजुरी-04, पिंपरी निर्मळ-07, एकरुखे-03, दाढ बुद्रुक-04, हसनापूर-03, चंद्रापूर-01, लोणी बुद्रुक-10, गोगलगाव-04, लोणी खुर्द-23, डोर्‍हाळे-02, कनकुरी-01, नांदुर्खी बदु्रक-04, कोर्‍हाळे-02, केलवड बुद्रुक-01, केलवड खुर्द-01, साकुरी-06, खडकेवाके-01, आडगाव बुदु्रक-06, कोल्हार-14, भगवतीपूर-06, बाभळेश्वर बुद्रुक-04, पाथरे-03, हनुमंतगाव-06, लोहगाव-01, सावळीविहिरी बुदु्रक-06, निमगाव-06, निघोज-01, रुई-02, पिंपळवाडी-04, वाकडी-11, धनगरवाडी-03, चितळी-23, पुणतांबा-17, रांजणखोल-15, नांदूर बुदुक-08, रामपूरवाडी-02, नपावाडी-02, असे 230 शिर्डी-24, राहाता-18, बाहेरील तालुक्यातील 09 असे एकूण 281 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

गेले चार ते पाच दिवस करोनाने राहाता तालुक्यात दिलासा दिला होता. मात्र गेल्या दोन दिवसापासून पुन्हा तालुक्यात करोनाने कहर केला आहे. काल पुन्हा 281 करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे नागरिकांनी पुन्हा चिंता व्यक्त केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com