राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात करोनाचा उद्रेक वाढतच चालला असून दिवसभरात 140 करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने

तालुका लॉकडाऊनकडे वाटचाल करताना दिसून येत आहे. सर्वाधीक रुग्ण राहाता, शिर्डी, लोणी, कोल्हार व पाथरे येथे आढळून आले.

आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणावर चाचण्या व खबरदारी घेतली जात असतानाही राहाता तालुक्यातील करोना बाधितांचा आकडा कमी होण्याऐवजी त्यात रोज दुप्पटीने वाढ होत असल्याने प्रशासन चिंतेत पडले आहे. गेल्या 24 तासांत तालुक्यात 140 रुग्ण पॉझीटिव्ह सापडले असून यात सर्वाधीक राहाता शहरात 29 जण, शिर्डीत 25 जण, लोणी बु. 13 व लोणी खुर्द 13, कोल्हारमध्येे 17 रुग्ण, पाथरे गावात 11 रुग्ण, साकुरी 7 जण, अस्तगावात 5 रुग्ण, निर्मळ पिंप्री 4 जण तसेच पिंपळस, रांजणखोल, डोर्हाळे, पुणतांबा, बाभळेश्वर, वाकडी, तिसगाव, दाढ, चंद्रपूर, या गावांमधेही करोनाने डोके वर काढले असून गेल्या पंधरा दिवसांत तालुक्यात रुग्ण वाढ होत असून सर्वाधीक रुग्ण प्रथमच तालुक्यात सापडल्याने तालुक्याची लॉकडाऊनकडे वाटचाल सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

तातडीने करोना प्रतिबंधीत औषधे फवारा

तालुक्यात मोठ्या प्रमाणावर करोना रूग्ण वाढत असून राहाता शहरात रोज पंचवीसच्या पुढे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे राहाता शहरात तातडीने औषध फवारणी करणे गरजेचे असून तसेच ज्या परिसरात अधिक रुग्ण सापडत आहेत तो परीसर सिल करण्याची गरज असताना तेथे कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसून सदर भागात आरोग्य विभागाने तातडीने संशयित रुग्णांच्या तपासण्या करून साखळी तोडण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असताना तसे होताना दिसून येत नाही. याप्रकरणी तहसीलदारांनी कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याची नागरिक मागणी करत आहेत.