राहाता तालुक्यात 373 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

41 करोनाबाधितांची भर; 11 जणांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 373 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण
COVID-19

राहाता |प्रतिनिधी| Rahata

मार्च, एप्रिल महिन्यात काही अहवाल पेंडींग राहिले होते ते काल आढळून आल्यामुळे काल राहाता तालुक्यात 41 करोनाबाधित रुग्ण दिसून येत आहेत. प्रत्यक्षात राहाता तालुक्यात नवीन 03 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. 11 रुग्ण बरे होऊन काल घरी गेले.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 20756 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 20089 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यात खासगी रुग्णालयात 40 तर अँटीजेन चाचणीत 01 रुग्ण आढळून आले आहेत.

राहाता तालुक्यातील चोळकेवाडी-01, लोणी बुद्रुक-01, असे 02 तर राहाता-01 असे एकूण 03 रुग्ण आढळून आले आहेत.

काल राहाता तालुक्यात करोनाबाधितांची संख्या प्रत्यक्षात 03 दिसून येत असली तरी मार्च, एपिल महिन्यात पेंडींग राहिलेले काही अहवाल काल प्राप्त झाल्यामुळे करोनाबाधित रुग्णांची संख्या 41 वर जाऊन पोहोचली आहे. तसेच करोनातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 11 असून त्यामुळे तालुक्यात काल 373 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह दिसून येत असून ते तालुक्यात व तालुक्याबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com