राहाता तालुक्यात 161 जणांना डिस्चार्ज

राहाता तालुक्यात 161 जणांना डिस्चार्ज

554 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह; 91 करोनाबाधित रुग्ण

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात काल 91 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होऊन घरी जाणार्‍यांची संख्या 161 वर जाऊन पोहोचली आहे. तर 554 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 18981 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 18333 रुग्ण बरे होऊन घरी गेले. ,आज 554 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत.

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 12, खासगी रुग्णालयात 42 तर अँटीजेन चाचणीत 37 रुग्ण आढळून आले आहेत. तर 161 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राहाता तालुक्यातील अस्तगाव-02, एकरुखे-01, रांजणगाव-02, दाढबुदुक-04, लोणी बुद्रुक-09, लोणी खुर्द-05, डोर्‍हाळे-01, केलवड बुद्रुक -01, साकुी-04, खडकेवाके-01, पिंपळस-01, कोल्हार-02, भगवतीपूर-01, बाभळेश्वर बुद्रुक-03, हनुमंतगाव-01, सावळीविहिर बुद्रुक-02, सावळीविहिर खुर्द-01, निमगाव-03, शिंगवे-01, वाकडी-08 एुलमवाडी-02, चितळी-02, पुणतांबा-06, रांजणखोल-05, रामपूरवाडी-02, असे एकूण 70, शिर्डी-08, राहाता-06, बाहेरील तालुक्यातील 07 असे एकूण 91 रुग्ण आढळून आले आहेत.

काल राहाता तालुक्यात करोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने तालुक्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. काल 86 करोनाबाधित रुग्ण आढळून आले होते तर काल 91 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याच दरम्यान करोनातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 161 वर जाऊन पोहोचल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. सध्या तालुक्यात केवळ 554 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com