राहाता तालुक्यात काल 354 रुग्णांना डिस्चार्ज

राहाता तालुक्यात काल 354 रुग्णांना डिस्चार्ज

235 करोनाबाधित रुग्ण; लोणी बुद्रुक-34, लोणी खुर्द-25

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात काल पुन्हा करोनाने आपला चढता आलेख कायम ठेवला असून काल 235 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होऊन घरी जाणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. काल 354 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 92 खासगी रुग्णालयात 128 तर अँटीजन चाचणीत 15 रग्ण आढळून आले आहेत. तर 354 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तालुक्यात राजुरी-04, ममदापूर-01, पिंपरी निर्मळ-02, एकरुखे-02, रांजणगाव-03, दाढ बुद्रुक-04, लोणी बुद्रुक-34, गोगलगाव-03, लोणी खुर्द-25, नांदुर्खी खुर्द-02, कोर्‍हाळे-02, केलवड खुर्द-01, साकुरी-01, आडगाव बुदु्रक-05, कोल्हार-10,भगवतीपूर-01, बाभळेश्वर बुद्रुक-08, तिसगाववाडी-01, पाथरे-01, हनुमंतगाव-04, लोहगाव-03, सावळीविहिरी बुदु्रक-05, निमगाव-06, रुई-02, शिंगवे-01, वाकडी-23, जळगाव-02, धनगरवाडी-03, एलमवाडी-04, चितळी-11, पुणतांबा-23, रांजणखोल-04, नांदूरबुद्रुक -03, नपावाडी-01 असे 205 शिर्डी-07, राहाता-13, बाहेरील तालुक्यातील 10असे एकूण 235 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

काल पुन्हा शिर्डी, राहाता शहरातील करोनाबाधितांना दिलासा मिळाला मात्र पुणतांबा, लोणी खुर्द व लोणी बुद्रुक येथे रुग्ण संख्येचा आलेख चढताच आहे. तालुक्यात 354 रुग्णांनी डिस्चार्ज घेतला आहे. त्यामुळे बरे होणार्‍यांचे प्रमाण खूपच चांगले आहे. मात्र करोना बाधितांचा आकडाही 235 पर्यंत जाऊन पोहोचल्याने नागरिकांमध्ये चिंता कायम आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com