राहाता तालुक्यात 203 जणांना डिस्चार्ज

राहाता तालुक्यात 203 जणांना डिस्चार्ज

624 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह; 86 नवीन करोनाबाधित

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात काल 86 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होऊन घरी जाणार्‍यांची संख्या 203 वर जाऊन पोहोचली आहे. तर 624 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 18890 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 18172 रुग्ण बरे होऊन घरी गेले. ,आज 624 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत.

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 04, खासगी रुग्णालयात 46 तर अँटीजेन चाचणीत 36 रुग्ण आढळून आले आहेत. तर 203 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राहाता तालुक्यातील अस्तगाव-01, ममदापूर-01, दाढ बुद्रुक-02, दुर्गापूर-02, लोणी बुद्रुक-07, गोगलगाव-02, लोणी खुर्द-02, नांदुर्खी बुद्रुक-01, कोर्‍हाळे-01, केलवड बुद्रुक -03, आडगाव बुद्रुक-01, कोल्हार-02, भगवतीपूर-01, बाभळेश्वर बुद्रुक-06, हनुमंतगाव-03, सावळीविहिर बुद्रुक-04, निघोज-03, रुई-01, पिंपळवाडी-02, वाकडी-02, पुणतांबा-12, रांजणखोल-04, नपावाडी-01 असे एकूण 64, शिर्डी-07, राहाता-14, बाहेरील तालुक्यातील 01 असे एकूण 86 रुग्ण आढळून आले आहे.

काल राहाता तालुक्यात करोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने तालुक्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. काल 153 करोनाबाधित रुग्ण आढळून आले होते तर काल 86 करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने निम्म्याने हा आकडा कमी झाला आहे. त्याच दरम्यान करोनातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 203 वर जाऊन पोहोचल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. सध्या तालुक्यात केवळ 624 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com