राहाता तालुक्यात 272 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

36 करोनाबाधितांची भर ; 15 जणांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 272 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी डिस्चार्ज घेणार्‍यांचे प्रमाणही 15 झाले आहे. राहाता तालुक्यात काल केवळ 36 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यात करोनाबधित अ‍ॅक्टीव्ह संख्या 272 वर जाऊन पोहोचली आहे.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 20180 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 20000 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 00 खासगी रुग्णालयात 27 तर अँटीजन चाचणीत 09 रुग्ण आढळून आले आहेत. तर 15 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राहाता तालुक्यातील दाढ बुदुक-09, लोणी बुद्रुक-02, गोगलगाव-03, कोर्‍हाळे-01, कोल्हार-03, पाथरे-01, लोहगाव-02, निमगाव-01, वाकडी-05, पुणतांबा-02, नपावाडी-01, असे 30 शिर्डी-01, राहाता-04 बाहेरील तालुक्यातील 01 असे एकूण 6 रुग्ण आढळून आले आहेत.

काल राहाता तालुक्यात करोनाबाधितांची संख्या वाढली आहे. तर डिस्चार्ज घेणार्‍यांची संख्याही 15 झाली. त्यामुळे अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्याही वाढली. काल 36 करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे तालुक्यात काल 272 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते तालुक्यात व तालुक्या बाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com