राहाता तालुक्यात 109 करोनाबाधित रुग्ण

542 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह; 264 जणांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 109 करोनाबाधित रुग्ण
कराेना रुग्ण

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात काल 109 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होऊन घरी जाणार्‍यांची संख्या 264 वर जाऊन पोहोचली आहे. तर 542 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 19330 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 18788 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज 542 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत.

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 24 खासगी रुग्णालयात 52 तर अँटीजेन चाचणीत 33 रुग्ण आढळून आले आहेत. तर 94 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राहाता तालुक्यातील राजुरी-03, पिंपरी निर्मळ -02,एकरूखे -02, दाढ बुद्रुक-02, लोणी बुद्रुक-10, गोगलगाव-02, लोणी खुर्द-05, डोर्‍हाळे- 01, नांदुर्खी बुदु्रक-02, कोर्‍हाळे-03, केलवड बुद्रुक-10, साकुरी-01, खडकेवाके-02, कोल्हार-05, भगवतीपूर-03, तिसगाववाडी- 01, पाथरे-02, लोहगाव-02, सावळीविहिर बुद्रुक-02, सावळीविहिर खुर्द-01, पिंपळवकडी-01, शिंगवे-01, वाकडी-05, जळगाव-02 पुणतांबा-12, न. पा. वाडी-01 असे एकूण 135, शिर्डी-09, राहाता-01, बाहेरील तालुक्यातील 01 असे एकूण 109 रुग्ण आढळून आले आहेत.

काल राहाता तालुक्यात करोनाबाधितांची संख्या. परवा 158 करोनाबाधित रुग्ण आढळून आले होते तर काल 109 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याच दरम्यान करोनातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 264 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या तालुक्यात केवळ 542 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com