राहाता तालुक्यात 229 जणांना डिस्चार्ज

741 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण; 153 नवीन करोनाबाधित
राहाता तालुक्यात 229 जणांना डिस्चार्ज

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात काल 153 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होवून घरी जाणार्‍यांची संख्या 229 वर जावून पोहोचली आहे. तर 741 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 18804 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 17969रुग्ण बरे होवून घरी गेले. ,आज 741 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत.

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 15 खासगी रुग्णालयात 78 तर अँटीजन चाचणीत 60 रुग्ण आढळून आले आहेत. तर 229 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

राहाता तालुक्यातील अस्तगाव-03, मोरवाडी-01, ममदापूर-01, एकरुखे-03, दाढ बुद्रुक-01, दुर्गापूर-06, लोणी बुद्रुक-08, गोगलगाव-05, लोणी खुर्द-21, डोर्‍हाळे-01, कनकुरी-0, नांदुर्खी बुदुक-02, कोर्‍हाळे-01, केलवड बुद्रुक -06, साकुरी-04, पिंपळस-01, पिंपरी लौकाई-01, कोल्हार-08, भगवतीपूर-02, बाभळेश्वर बुद्रुक-05, पाथर-01, हनुमंतगाव-02, लोहगाव-01, सावळीविहिर बुद्रुक-03, निमगाव-01, रुई-02, पिंपळवाडी-01, शिगवे-02, वाकडी-11, जळगाव-01, धगगरवाडी-02, चितळी-06, पुणतांबा-07, रामपूरवाडी-03, असे एकूण 126, शिर्डी-12, राहाता-11, बाहेरील तालुक्यातील 04 असे एकूण 153 रुग्ण आढळून आले आहे.

काल राहाता तालुक्यात करोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने तालुक्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. काल 262 करोनाबाधित रुग्ण आढळून आले होते तर काल 153 करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने निम्म्याने हा आकडा कमी झाला आहे. त्याच दरम्यान करोनातून बरे होवून घरी गेलल्यांची संख्या 229 वर जावून पोहोचल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. सध्या तालुक्यात केवळ 741 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com