राहाता तालुक्यात 134 जणांना डिस्चार्ज

400 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह; 86 नवीन करोनाबाधित
राहाता तालुक्यात 134 जणांना डिस्चार्ज

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात काल 86 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होवून घरी जाणार्‍यांची संख्या 134 वर जावून पोहोचली आहे. तर 400 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 19416 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 18923 रुग्ण बरे होवून घरी गेले. आज 400 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत.

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 05 खासगी रुग्णालयात 26 तर अँटीजन चाचणीत 55 रुग्ण आढळून आले आहेत. तर 86 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

राहाता तालुक्यातील राजुरी-02, ममदापूर-01, पिंपरी निर्मळ -02, एकरूखे -03, रांजणगाव-01, लोणी बुद्रुक-05, गोगलगाव-05, डोर्‍हाळे- 01, नांदुर्खी बुदुक-02, केलवड बुद्रुक-02, साकुरी-02, दहेगाव-04, पिंपळस-01, आडगाव बुदुक-01, कोल्हार-04, भगवतीपूर-05, बाभळेश्वर-04, हनुमंतगाव-04, लोहगाव-02, सावळीविहिर बुद्रुक-01, रुई-01, वाकडी-07, धनगरवाडी-02, पुणतांबा-01, रांजणखोल-02, नांदूर बुद्रुक-04, असे एकूण 67 शिर्डी-09, राहाता-08, बाहेरील तालुक्यातील 02असे एकूण 86 रुग्ण आढळून आले आहे.

काल राहाता तालुक्यात करोनाबाधितांची संख्या काल घटली. परवा 109 करोनाबाधित रुग्ण आढळून आले होते तर काल 86 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्याच दरम्यान करोनातून बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या 134 वर जावून पोहोचले आहे. सध्या तालुक्यात केवळ 400 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com