इंधन दरवाढी विरोधात राहाता काँग्रेस कमिटीचे निदर्शने

मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
इंधन दरवाढी विरोधात राहाता काँग्रेस कमिटीचे निदर्शने

राहाता | वार्ताहार

इंधन दरवाढीच्या (Fuel price hike) विरोधात राहाता तालुका काँग्रेस कमिटीच्या (Rahata Taluka Congress Committee) वतीने पेट्रोल पंप आवारात निदर्शने करून मोदी सरकार (Modi Govt) विरोधात घोषणा देण्यात आल्या.

इंधन दरवाढी विरोधात राहाता काँग्रेस कमिटीचे निदर्शने
पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची सायकल रॅली

सोमवारी सकाळी ११ वाजता राहाता येथील पेट्रोल पंपावर काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीच्या विरोधात निदर्शने केले. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले कि देशात भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅसमध्ये मोठ्या प्रमाणात दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. इंधन दरवाढ गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसत आहे. केंद्र सरकारने तात्काळ इंधन दरवाढ कमी करून सर्वसामान्य जनतेला आर्थिक संकटातून बाहेर काढावे.

यावेळी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पंकज लोंढे ,तालुका अध्यक्ष रावसाहेब बोठे, बाळासाहेब खर्डे, रमेश गागरे ,राहाता शहर अध्यक्ष नितीन सदाफळ ,युवा अध्यक्ष अमृत गायके, मुन्ना फिटर, प्रवीण घोडेकर, सतीश आत्रे ,अनिस शेख ,राहाता युवक शहराध्यक्ष सचिन गाडेकर, दादासाहेब गवांदे, बबन नळे, गणेश चोळके, सय्यद शेख, बच्चू जेजुरकर ,एन एस यू आय राहाता शहर अध्यक्ष अभिषेक वाघमारे ,एन एस यु आय शिर्डी अध्यक्ष स्वराज त्रिभुवन अमोल आरणे, संजय जेजुरकर, यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या आंदोलकांवर टीका करण्यापेक्षा केंद्र सरकारने केलेली इंधन दरवाढ कमी करण्यासाठी प्रयत्न करुन सर्वसामान्य जनतेची महागाई पासून होणारी आर्थिक पिळवणूक थांबवणे करिता केंद्रात आपले वजन वापरून इंधन दरवाढ कमी करण्यासाठी प्रयत्न करावे.

नितीन सदाफळ

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com