राहात्यात कोव्हॅक्सिन उपलब्ध होत नसल्याने दुसर्‍या डोसपासून नागरिक वंचित

राहात्यात कोव्हॅक्सिन उपलब्ध होत नसल्याने दुसर्‍या डोसपासून नागरिक वंचित

राहाता |प्रतिनिधी| Rahata

ग्रामीण रुग्णालयातील कारभार भाजप कार्यकर्त्यांनी चव्हाट्यावर आणल्यानंतर आज गुरूवारी लसीकरणात काही प्रमाणात ्सुसूत्रता दिसून आली. राज्य सरकारने 45 वयोगटापुढील नागरिकांना फक्त दुसरा डोस देण्याचा निर्णय घेतल्याने गर्दीही अत्यल्प दिसून आली. मात्र कोव्हॅक्सिनच्या लसीचा तुटवडा जाणवत आहे त्यामुळे कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या अनेकांचा हिरमोड होत आहे.

कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन प्रकारच्या लस दिल्या जात आहेत. सध्या कोविशिल्ड लस उपलब्ध असल्याने राहाता ग्रामिण रुग्णालयात कोविशिल्डची लस घेण्यासाठी सकाळपासून नगर नागरिकांनी नाव नोंदणी केली. 200 लस उपलब्ध झाल्याने आणि 45 वयोगटाच्या पुढे दुसरा डोस दिला जात असल्याने गर्दीचे प्रमाण अत्यल्प दिसून आले. पहिल्या कोविशिल्डचा डोसला 42 दिवस पूर्ण झालेल्यांना लस देण्यात आली तर त्याहून कमी कालावधी झालेल्यांना विना लस घेता परतावे लागले. फलकावर तशा सूचना दिल्याने गोंधळ कमी झाला.

कोविशिल्डचा दुसरा डोस मिळत असला ्तरी कोव्हॅक्सिनचा डोस मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. 20 मार्चनंतर डोस घेणार्‍या नागरिकांना अद्यापही दुसरा डोस मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस वेळेत मिळावा अशी मागणी नागरिक करत आहेत. ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोकुळ घोगरे यांनी जिल्हा प्रशासनाकडून जसा लस साठा प्राप्त होईल त्या पद्धतीने लसिकरण सुरू असून कोव्हॅक्सिन लवकरच उपलब्ध होईल, अशी माहिती दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com