राहात्यातील बैलगाडा शर्यतीला 80 ते 90 स्पर्धकांचा सहभाग

राहात्यातील बैलगाडा शर्यतीला 80 ते 90 स्पर्धकांचा सहभाग

राहाता |वार्ताहर| Rahata

शहरात विरभद्र व नवनाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यात प्रथमच या बैलगाडा शर्यतीत 80 ते 90 स्पर्धकांनी सहभाग घेऊन बैलगाडा शर्यतीचा उच्चांक नोंदविला आहे. बैलगाडा शर्यतीची बाजी मारणार्‍या स्पर्धकांना विरभद्र देवस्थान ट्रस्टच्यावतीने उत्तेजनार्थ बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.

करोना काळानंतर राहाता शहरात विरभद्र व नवनाथ देवांच्या यात्रेला भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून विरभद्र देवस्थानने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांचा मनसोक्त आनंद घेतला. बैलगाडा शर्यत बघण्याकरिता राहाता तालुक्यासह इतर तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या बैलगाडा शर्यतीत सहभाग घेण्यासाठी राहाता, केलवड, साकुरी, बाभुळगाव, चांदवड, मोरवाडी, येवला, नांदूर, गोटेवाडी, चाळीसगाव, मालखेडा, डांगे वाडी, उजनी, गोगलगाव, रामपूरवाडी, कोळपेवाडी, पालखेड, उकडगाव, गेवराई, कोपडी, कवठे कमळेश्वर या गावांसह इतर गावातील स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन उच्चांक नोंदविला.

देवस्थानचे अध्यक्ष सागर सदाफळ व विश्वस्त मंडळ तसेच शहरातील ग्रामस्थांनी बैलगाडा शर्यत शांततेत पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून नगर येथील होमगार्ड सुरक्षा दलाच्या पथकाला बोलावले होते. नगर येथे येथील सुरक्षा दलाच्या पथकांनी व राहाता येथील पोलीस कर्मचार्‍यांनी बैलगाडा शर्यत शांततेत होण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.

यावेळी गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजुरकर, पिंपळसचे सरपंच दत्तात्रय घोगळ, माजी सरपंच भारत लोखंडे, साकुरीचे माजी सरपंच दिपक रोहोम, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश बावके, आ. विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक अनुप कदम, विरभद्र देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सागर सदाफळ, उपाध्यक्ष राजेंद्र गायकवाड, राहुल सदाफळ, मुन्ना सदाफळ, तुषार सदाफळ, संजय भाकरे, डॉ. सुरेश बोठे, अक्षय रोहोम, अजय आग्रे, गणेश बोरकर, योगेश डांगे, महेश बोरकर, गोटू बोरकर, अमोल गाडेकर, डॉ. महेश गव्हाणे, विजय सदाफळ, अण्णासाहेब लांडबिले, पप्पू शेळके, चांगदेव गिधाड, ज्ञानेश्वर सदाफळ, संतोष बोरकर, सागर भुजबळ, विजय गाडेकर यांच्यासह विरभद्र देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.