राहात्यातील लाचखोर मंडल अधिकार्‍यास रंगेहाथ पकडले

राहात्यातील लाचखोर मंडल अधिकार्‍यास रंगेहाथ पकडले

राहाता |प्रतिनिधी| Rahata

वडिलांनी खरेदी केलेल्या शेत जमिनीची 7/12 वर नाव लावायला 3 लाखांची मागणी केली होती. त्यातील 2 लाख रुपयांची रक्कम स्विकारताना नाशिकच्या लाचलुचपत पथकाने राहाता येथील मंडलअधिकारी जगन्नाथ आसाराम भालेकर यास 2 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे पोलीस उपअधीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रभाकर निकम तसेच पोलीस हवालदार प्रफुल्ल माळी पोलीस नाईक नितीन कराड प्रभाकर गवळी चालक पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने दोन लाख रुपयांची लाच घेणार्‍या मंडल अधिकार्‍यास रंगेहाथ पकडून सापळा यशस्वी केला आहे.

जगन्नाथ भालेकर याने राहाता येथील तक्रार दाराकडुन 7/12 वर नाव लावायला 3 लाखांची मागणी केली होती. त्यातील 2 लाख रुपयांची रक्कम राहाता शहरातील मंडलाधिकारी कार्यालयात दोन लाख रुपये पंच व साक्षीदार यांचे समक्ष स्वत भालेकर याने स्विकारली असता स्विकारताना त्याला रंगेहाथ पकडले आहे.

मंडलाधिकारी जगन्नाथ भालेकर याने अशाच प्रकारे अनेकांकडून लाच घेतल्याची माहीती विभागाला मिळाली असुन भालेकर याला लाच घेताना पकल्याची माहीती मिळताच एक जण अधिकार्‍यांचा सत्कार करण्यासाठी थेट मंडळ अधिकारी कार्यालयासमोर पोहचला. या कारवाईमुळे महसुल विभागातील लाचखोरांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. कोणी लाच मागत असेल तर तात्काळ लाचलुचपत प्रतिबंध विभागास माहिती द्यावी. असे आवाहन पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com