राहाता बाजार समितीत कांद्याच्या 12453 गोण्यांची आवक

राहाता बाजार समितीत कांद्याच्या 12453 गोण्यांची आवक
File photo

अस्तगाव | वार्ताहर

काल शु क्रवारी राहाता बाजार समितीत (Rahata Bazar Samiti) 12453 गोणी कांद्याची (onion)आवक झाली तर डाळिंबाच्या (Pomegranate) 18246 क्रेटसची आवक झाली. कांद्याला 1800 रुपये भाव मिळाला.

कांदा नंबर 1 प्रति क्विंटलला 1400 ते 1800 असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 850 ते 1350 असा भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 400 ते 800 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा 1200 ते 1400 व जोड कांदा 100 ते 400 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाची 18246 क्रेट्सची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब नंबर 1 ला 91 ते 125 इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 61 ते 90 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 31 ते 60 रुपये व डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 30 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com