टेम्पोच्या धडकेत मारुती ओम्नी पलटी!

एसटी बसलाही धडक
टेम्पोच्या धडकेत मारुती ओम्नी पलटी!

अस्तगाव (वार्ताहर)

वेगाने जाणार्‍या आयशरने टेम्पोने एका मारुती ओमनीस जोराची धडक दिल्याने ओमनी पलटी झाली. याच वेळी एसटी बसलाही जोराची धडक दिली. हा तिहेरी अपघात अस्तगाव माथ्यावर काल पाचच्या सुमारास अस्तगाव माथ्यावरील साईसिमरण हॉटेल पासुन काही अंतरावर घडला.

याप्रकरणी राहाता पोलिसांनी आयशर टेंम्पो क्रमांक आर. जे. 23 जीबी 9220 चा चालक सलमान अकबर खान (रा. मुंडरु ता. श्रीमाधवपूर, राजस्थान) यावर मारुती ओमनी एमएच 19 एपी 0093 च्या चालक सुनिल कारभारी सुर्यवंशी (रा. गणेशपूर, चाळीसगाव जि. जळगाव) यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा रजि. 294/2021 भादवि कलम 279, 337, 427 सह एमव्हीए 187/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील आरोपी आयशर टेंम्पो चालक सलमान अकबर खान याने नगर च्या दिशेने जात असताना याच दिशेने जात असलेल्या मारुती ओमनी हीस मागुन जोराची धडक दिली. या धडकेत मारुती ओमनी गाडीने पलटी खाल्ली व चारही चाके वर झाली. या गाडीत चालकासह सात ऊस तोड मजुर होते. चालकाला कमी अधिक प्रमाणात दुखापत झाली. तसेच ओमनीला धडक मारताच हा आयशर टेंम्पोने डिव्हायडर च्या बाजुने जात असलेल्या शिर्डी औरंगाबाद या नेवासा डेपोच्या (एमएच 14 बीटी 3369) बसलाही क्लिनरच्या बाजुने धडक मारली. या अपघातात तिन्ही वाहानाचे कमी अधिक प्रमाणात नुकसान झाले. या अपघातास कारणीभुत झाल्याच्या कारणावरुन आयशर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास राहाता पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल डी. आर. कदम हे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com