अस्तगावसह राहात्यातील 12 ग्रामपंचायतींवर प्रशासक

अस्तगावसह राहात्यातील 12 ग्रामपंचायतींवर प्रशासक

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

राहाता तालुक्यातील दुसर्‍या टप्प्यातील 12 ग्रामपंचायतींच्या मुदत सप्टेंबरमध्ये संपणार असल्यामुळे

या ग्रामपंचायतींवर प्रशासकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी हे आदेश काढले आहेत.

सप्टेंबरमध्ये संपणार्‍या 12 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. गटविकास अधिकारी शेवाळे यांनी या ग्रामपंचायतींवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 35 चे तरतुदीनुसार या नेमणुका 9 सप्टेंबरपासून केल्या आहेत.

ग्रामपंचायती व प्रशासक असे- आडगाव बुद्रुक- गायकवाड एस. बी. (शाखा अभियंता जि. प. सा. बां. उपविभाग राहाता), अस्तगाव- गायकवाड एस. बी. (विस्तार अधिकारी, पंचायत समिती राहाता), एकरुखे- क्षिरसागर बी. बी. (केंद्रप्रमुख, शिक्षण विभाग पं. स. राहाता), जळगाव- श्रीमती गुंड एच. बी. (पर्यवेक्षिका, बाल विकास प्रकल्प राहाता), केलवड बुद्रुक- घिगे बी. के. (विस्तार अधिकारी (सांख्यकी) पं. स. राहाता), पिंपळवाडी- कुर्‍हे एस. बी. (कृषी अधिकारी, पं. स. राहाता),

पिंपरी लोकई- पवार एस. आर (केंद्रप्रमुख शिक्षण विभाग, पं. स. राहाता), रामपूरवाडी- गिते ई. एस. (शाखा अभियंता, जि. प. सा. बां. उपविभाग राहाता), रांजणगाव खुर्द- शेलार एन. के. (केंद्र प्रमुख, शिक्षण विभाग पं. स. राहाता), वाळकी- श्रीमती जाधव जे. बी. (विस्तार अधिकारी, कृषी, पं. स. राहाता), सावळीविहीर खुर्द- वाघमारे एन. एम. (कनिष्ठ अभियंता ल. पा. उपविभाग राहाता), शिंगवे- चोपडे पी. एस. (विस्तार अधिकारी, कृषी, पं. स. राहाता).

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com