राहाता तालुक्यात 200 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण; 29 नवीन करोनाबाधित

राहाता तालुक्यात 200 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण; 29 नवीन करोनाबाधित

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी डिस्चार्ज घेणार्‍यांचे प्रमाणही कमी झाले आहे. राहाता तालुक्यात काल केवळ 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून केवळ 29 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 20130 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 19913 रुग्ण बरे होवून घरी गेले.

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 00 खासगी रुग्णालयात 14 तर अँटीजन चाचणीत 15 रुग्ण आढळून आले आहेत. तर 13 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

राहाता तालुक्यातील अस्तगाव-01, ममदापूर-01, एकरुखे-02, लोणी बु्रदु्रुक-01, केलवड बुद्रुक-01, साकुरी-02, दहेगाव-02, भगवतीपूर-01, वाकडी-02, धनगरवाडी-01, पुणतांबा-01, नांदूरबुदुक-03, असे एकूण 19 शिर्डी-07, राहाता-02 बाहेरील तालुक्यातील 1 असे एकूण 29 रुग्ण आढळून आले आहे.

काल राहाता तालुक्यात करोनाबाधितांची संख्या कमी असली तरी डिस्चार्ज घेणार्‍यांची संख्याही खूपच कमी झाली आहे. त्यामुळे अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्याही काही प्रमाणात वाढत आहे. काल 29 करोनाबाधित रुग्ण आढळले असले तरी केवळ 13 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तालुक्यात काल 200 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते तालुक्यात व तालुक्या बाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com