राहाता तालुक्यात 70 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

राहाता तालुक्यात 70 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata) 19 करोनाबाधित रुग्ण (Corona Positive Patient) दिसून येत आहेत. काल 26 रुग्ण बरे होऊन गेल्यामुळे काल अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 70 वर जाऊन पोहोचली आहे. राहाता (Rahata) तालुक्यात आतापर्यंत 20907 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 20837 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यात खासगी रुग्णालयात 15 तर अँटीजेन चाचणीत 04 रुग्ण आढळून आले आहेत.

तर 26 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.राहाता तालुक्यातील चोळकेवाडी-02, लोणी बुद्रुक-01, गोगलगाव-02, साकुरी-01, पिंपळस-01, कोल्हार-02, बाभळेश्वर बुद्रुक-01, पुणतांबा-01, रस्तापूर-01 असे 12 तर शिर्डी-02, राहाता-05 बाहेरील तालुक्यातील 00 असे एकूण 19 रुग्ण आढळून आले आहेत.

काल राहाता तालुक्यात करोनाबाधितांची संख्या (Corona Positive Patient) 19 असून 26 जणांना बरे वाटल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे 70 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह दिसून येत असून ते तालुक्यात व तालुक्याबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com