राहाता तालुक्यात 93 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

राहाता तालुक्यात 93 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

37 करोनाबाधितांची भर; 13 रुग्णांना डिस्चार्ज

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata) 37 करोनाबाधित रुग्ण (Corona Positive Patient) दिसून येत आहेत. काल 13 रुग्ण बरे होऊन गेल्यामुळे काल अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 93 वर जाऊन पोहोचली आहे.

राहाता तालुक्यात (Rahata) आतापर्यंत 20965 करोनाबाधित रुग्ण (Corona Positive Patient) आढळून आले. तर 20872 रुग्ण बरे होवून घरी गेले. त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 00 खासगी रुग्णालयात 12 तर अँटीजेन चाचणीत 25 रुग्ण आढळून आले आहेत. तर 13 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक-18, गोगलगाव-01, कोर्‍हाळे-01, साकुरी-02, खडकेवाके-01, सावळीविहरीर बुद्रुक-01, वाकडी-10, जळगाव-01, असे 23 तर शिर्डी-01, राहाता-01 बाहेरील तालुक्यातील 00 असे एकूण 37 रुग्ण आढळून आले आहे. काल राहाता तालुक्यात करोनाबाधितांची संख्या 37 असून 13 जणांना बरे वाटल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे 93 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह दिसून येत असून ते तालुक्यात व तालुक्याबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com