राहाता तालुक्यात 184 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

13 जणांना डिस्चार्ज; 22 नवीन करोनाबाधित
राहाता तालुक्यात 184 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी डिस्चार्ज घेणार्‍यांचे प्रमाणही कमी झाले आहे. राहाता तालुक्यात काल केवळ 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून केवळ 22 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 20101 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 19900 रुग्ण बरे होवून घरी गेले.

या रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 03 खासगी रुग्णालयात 08 तर अँटीजेन चाचणीत 11 रुग्ण आढळून आले आहेत. तर 13 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक-06, लोणी बुद्रुक-02, कोर्‍हाळे-01, साकुरी-01, पाथरे-01, सावळीविहीर बुद्रुक-02, वाकडी-03, असे एकूण 16 शिर्डी-03, राहाता-03 बाहेरील तालुक्यातील 0 असे एकूण 22 रुग्ण आढळून आले आहेत.

काल राहाता तालुक्यात करोनाबाधितांची संख्या कमी असली तरी डिस्चार्ज घेणार्‍यांची संख्याही खूपच कमी झाली आहे. त्यामुळे अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्याही काही प्रमाणात वाढत आहे. काल 22 करोनाबाधित रुग्ण आढळले असले तरी केवळ 13 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे तालुक्यात काल 184 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते तालुक्यात व तालुक्याबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com