आडगाव परिसरात डुकरांचा हैदोस; सोयाबीन, मका पिकांची नासाडी

आडगाव परिसरात डुकरांचा हैदोस; सोयाबीन, मका पिकांची नासाडी

आडगाव | वार्ताहर

राहाता तालुक्यातील आडगाव खुर्द येथील चंद्रकांत शेळके, एकनाथ शेळके, अशोक कडलग, शिवाजी शेळके, गणपत शेळके, बाळासाहेब शेळके, सोमनाथ कडलग, पोपट शेळके, शेतकर्‍यांच्या शेतात डुकरांनी हैदोस घातला असून सोयाबीन व मक्याच्या पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी डूकरांकडून सुरू आहे.

मक्याची कणसे खाण्यासाठी डुकरे मकापिके भुईसपाट करीत आहे. त्यामुळे शेतकरी वैतागले असून या डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. सोयाबीन व मका पिकाला डुकरांपासून मोठा धोका वाढला. डुकरे टोळक्याने मका पिकावर रातोरात डल्ला मारत जमीनदोस्त करून चिकावर आलेल्या मकाच्या कणसांवर ताव मारतात. मकाचे पीक रात्रीतुन उध्वस्त करतात.

सध्या दरोज पाऊस पडत असल्याने शेतशिवार रस्ते पाण्याने डबडबले असून शेताकडे चिखल तुडवत जावे लागते. त्यातच रात्रीच्या वेळी बिबट्याचे भय असल्याने शेतकरी शेताकडे जाण्यास धजावत नाही. याचा फायदा डुकरांनी घेतला असून मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी करत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या डुकरांचा ताबडतोप बदोबस्त करण्याची मागणी वरील शेतकर्‍यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com