सत्यजीत तांबेंना विखेंकडून ऑफर

थोरातांनाही काढला चिमटा!
आ. राधाकृष्ण विखे पाटील
आ. राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई | Mumbai

विधानपरिषदेसाठी नाशिक पदवीधर मतदार संघातून अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे हेच निवडून येतील असा विश्वास भाजप नेते राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला आहे. तांबेंना त्यांनी भाजपच प्रवेश करण्याची विशेष ऑफरही दिली आहे. त्याचबरोबर तांबेंचे मामा असलेल्या बाळासाहेब थोरातांना राजकीय चिमटा काढला आहे.

राधाकृष्ण विखे म्हणाले, मामानं काय करावं तो मामाचा प्रश्न आहे, त्यानं आता पक्षालाही मामा बनवलं आहे. त्यामुळं मला वाटतं की त्यांची काय भूमिका असेल ती व्यक्तीगत आहे. त्यामुळं सत्यजीतचा विजय निश्चित आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करायला हवा. कारण बहुतांश ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सत्यजीत तांबेंसाठी काम केलं आहे.

त्यांनाच मतदान व्हावं यासाठीही भाजप कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळं नैतिकता म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचा आदर सत्यजीत ठेवतील असा मला विश्वास आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com