अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

यंदा जिल्ह्यात पावसाळा लांबल्या परिणाम रब्बी हंगामाच्या पेरणीवर झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 58 हजार हेक्टवर पेरणी झाली

असून यात सर्वाधिक क्षेत्र हे ज्वारी पिकाचे 1 लाख 91 हजार हेक्टर आहे. झालेल्या एकूण पेरणीची टक्केवारी 36 टक्के असून यावरून यंदा ज्वारीचे नियोजित क्षेत्र आणि रब्बी हंगामाचे नियोजित क्षेत्र घटण्याची शक्यता आहे.

नगर जिल्हा हा रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी हंगामात ज्वारी हे प्रमुख पिक असून त्याचे सरासरी क्षेत्र हे 4 लाख 77 हजार आहे. यासह गहू आणि हरभरा पिक देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेण्यात येत असून थंडीचे प्रमाण कमी असल्याने गहू आणि हरभरा पिकांच्या खोळंबल्या आहेत.

जिल्ह्यात आतपर्यंत 19 हजार 162 हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली असून 40 हजार 810 क्षेत्रावर हरभरा पिकाची पेरणी झालेली आहे. जिल्ह्यात ऊस पिकाची लागवडीचे क्षेत्र 42 हजार हेक्टरच्या पुढे गेले असून चारा पिकांचे क्षेत्र देखील 26 हजारांच्या जवळपास झाले आहे. कांदा पिकाची लागवड देखील विक्रमी झाली असून सध्या 57 हजार 845 कांदा पिक आहे.

अशी आहे पिकनिहाय पेरणी

ज्वारी 1 लाख 91 हजार हेक्टर, गहू 19 हजार 162 हेक्टर, मका 6 हजार 121 हेक्टर, हरभरा 40 हजार 810 हेक्टर, करडई 63, तीळ 31, जवस 28, सुर्यफुल 10, फळपिके 2 हजार 982, फुलपिके 375, मसाला पिके 77 आणि भाजीपाला पिके 6 हजार 657 असे आहेत.

कृषी विभागाच्या नियोजनानूसार जिल्ह्यात 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत गहू आणि हरभरा पिकांची पेरणी होते. मात्र, काही ठिकाणी ऊस तोडून झाल्यावर डिसेंबरअखेर गहू आणि हरभरा पिकांची पेरणी होते. यंदा मुबलक पाणी असतांनाही ज्वारीची आतापर्यंत अवघी 40 टक्के, गव्हाची 34 टक्के आणि हरभरा पिकाची 27 टक्के पेरणी झालेली आहे. यामुळे या पिकांची पेरणीचे क्षेत्र घटणार आहे. यात विशेष करून ज्वारीचे क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.