रब्बीतही सोयाबीन पेरणीमुळे पाचेगाव परिसरात उन्हाळ्यातही शिवार हिरवेगार

परिसरात प्रथमच 50 एकर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीन
रब्बीतही सोयाबीन पेरणीमुळे पाचेगाव परिसरात उन्हाळ्यातही शिवार हिरवेगार

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

कर्नाट नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील शेतकर्‍यांनी या वेळेस उन्हाळी हंगामातील सोयाबीन पेरल्यामुळे सध्या उन्हाळ्यात देखील या भागातील शिवार हिरवागार दिसू लागला आहे, आणि शेतकर्‍यांना आता पुढे सोयाबीनचे एकरी उत्पादन किती होते याकडे लक्ष लागले आहे.

या भागात जवळपास 50 एकर इतक्या क्षेत्रावर दहा-बारा शेतकर्‍यांनी उन्हाळी सोयाबीन पिके आपल्या शेतात पारंपरिक पद्धतीने बैल किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरून घेतली आहे. यात शेतकर्‍यांनी स्थानिक शेतकर्‍यांकडून व कृषी सेवा केंद्रातून फुले संगम या वाणाची सोयाबीन बियाणे उपलब्ध करून कोणी बारा इंच, 18 इंच तर कोणी दोन फुटापर्यंत पेरणी केलेली आहे. सर्व शेतकर्‍यांची उन्हाळी सोयाबीन पिके चांगल्या प्रकारे उगवून उन्हाळ्यात या भागातील शिवार हिरवागार दिसून येत आहे.

या भागात कांदा लागवडी क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात आहे, पण काही शेतकर्‍यांनाकडे कांदा रोपे असताना मजूर टंचाईमुळे कांदा लागवडीना उशीर झाला, त्यामुळे व कमी खर्चात येणारे पीक म्हणून शेतकर्‍यांनी मोकळ्या व आंतरपीक पद्धतीचा वापर करून या भागातील शेतकर्‍यांनी उन्हाळी सोयाबीनला पसंती दाखवून या भागात मोठ्या प्रमाणावर पेरण्या केल्या, आता जर या शेतकर्‍यांना या सोयाबीन पिकाला यावेळेस चांगल्या प्रकारे उत्पादन आले, तर मात्र पुढील वर्षी उन्हाळी सोयाबीन क्षेत्रात निश्चित वाढ होईल असा अंदाज या भागातील शेतकर्‍यांनी व्यक्त केला आहे.

एकदम कमी बियाणे वापरून शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या आहे, म्हणजे जर बारा इंच वर पेरणी केली तर साधारण एकरी फक्त वीस किलो बियाणे शेतात पेरणी करता लागले. आणि प्रति किलो 80 रुपये प्रमाणे बियाणे शेतकर्‍यांनी खरेदी केले. 1600 रुपये मध्ये एक एकर क्षेत्र पेरून झाले. पेरणीला एक एकर साठी बाराशे रुपये लागले, त्यामुळे रासायनिक खत सोडून 2800 रुपये प्रति एकरी सोयाबीन पेरणीला खर्च आला. कमी खर्चात जर चांगले उत्पादन मिळाले तर मात्र या क्षेत्रात निश्चितच वाढ होऊन या भागात पुढील वर्षी कांदा क्षेत्र घटण्याची चिन्ह दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com