रब्बीसाठी 10 नोव्हेंबरपर्यंत पाणी अर्ज भरावे

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले आवाहन
रब्बीसाठी 10 नोव्हेंबरपर्यंत पाणी अर्ज भरावे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

चालू पावसाळी हंगामात उशिरा का होईना पर्जन्यमान झाल्याने दारणा (Darna), गंगापूर धरण (Gangapur Dam) समुहाबरोबरच अन्य धरणातही पाण्याचा साठा (Dam water Storage) चांगल्या प्रमाणात झालेला आहे. नाशिक पाटबंधारे विभागाचे (Nashik Irrigation Department) कार्यक्षेत्रातील गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्यावरील रब्बी हंगामी (Rabbi Season) भुसार, बारमाही, फळबाग पिकासाठी (Orchard Crop) शेतकर्‍यांनी आपले पाणी अर्ज 10 नोव्हेंबरपर्यंत भरून द्यावे, असे आवाहन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे (BJP state secretary Snehlata Kolhe) यांनी केले.

स्नेहलता कोल्हे (Snehlata Kolhe) पुढे म्हणाल्या की, नाशिक पाटबंधारे विभागाने (Nashik Irrigation Department) याबाबतचे प्रकटन नुकतेच प्रसिध्द केलेले आहे. खरीप हंगामात (Kharif Season) अतिवृष्टीचा शेतकर्‍यांना फटका बसला. तेव्हा रब्बी हंगामाचे नियोजन काटेकोरपणे केले जावे. बारमाही गोदावरी कालवे (Godavari Canal) लाभधारक शेतकर्‍यांना रब्बी हंगाम पिकांसाठी पाण्याची गरज आहे. त्या शेतकर्‍यांनी नमुना नं. 7 वरील पाणी अर्ज तातडीने नजिकच्या सिंचन शाखा कार्यालयात 10 नोव्हेंबर पूर्वी सादर करावे म्हणून सुचित केलेले आहे.

उर्ध्व गोदावरी खोर्‍यातील सर्व धरणे शंभर टक्के भरलेली आहेत. जायकवाडी धरण (Jayakwadi Dam) समुहासाठी चालू पावसाळी हंगामात शंभर टक्के पाण्याचा साठा (Water Storage) झाल्याने यंदाचे हंगामात समन्यायी पाणी वाटपाची चिंता मिटली आहे. गोदावरी उजव्या आणि डाव्या कालव्यावरील रब्बी पिकांना पाणी देण्याबाबत नाशिक पाटबंधारे विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत रब्बी व उन्हाळ हंगामाचे पाणी नियोजन ठरते. मात्र मागील हंगामात ठरल्याप्रमाणे नाशिक पाटबंधारे विभागाने पाण्याची आर्वतने दिली नाही. त्यामुळे पिकांना गरजेच्यावेळी पाणी पुरवठा झाला नाही. त्याचा फटका शेतकर्‍यांना बसला. तेव्हा चालू कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत रब्बी व उन्हाळ हंगामाचे पाटपाण्याचे आवर्तन नियोजन वेळेत करावे. कालवा लाभक्षेत्रापासून अडीच किलोमीटर हद्दीपर्यंत पाणी पुरवठ्याचे नियोजन होवू नये, गोदावरी कालवे बारमाही ब्लॉकधारक शेतकर्‍यांचा पाणीहक्क डावलू नये,

सहकारी पाणीवापर संस्थांना मंजुर कोट्याप्रमाणेच पाणी द्यावे, रब्बी आर्वतनापूर्वी वितरिका उपवितरिका व मुख्य कालव्यातील काटेरी झुडपे, गबाळ याची स्वच्छता करावी, टेल टू हेड असेच पाटपाण्याचे नियोजन व्हावे, शेतकर्‍यांच्या भावनांचा विचार करावा केवळ बैठकांचा फार्स होवू नये, असे सांगून त्यांनी रब्बी हंगामात गोदावरी कालवे लाभधारक शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त पाणी मागणी अर्जाद्वारे नोंदवावी, असे आवाहन स्नेहलता कोल्हे यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com