रब्बी हंगाम नियोजनासाठी विहिरींची पाणी पातळीची मोजणी सुरू

पाणी फाउंडेशनचा पारनेर तालुक्यात उपक्रम
रब्बी हंगाम नियोजनासाठी विहिरींची पाणी पातळीची मोजणी सुरू

पारनेर |तालुका प्रतिनिधि| Parner

पाणी फाउंडेशन अंतर्गत पारनेर तालुक्यातील समृद्ध गाव स्पर्धेतील गावांमध्ये रब्बी हंगामच्या नियोजनासाठी विहिरीतील पाणी पातळीचे मोजमाप सुरू केले आहे. यामुळे उपलब्ध पाणी व पीक हंगाम याचा तांळेबंद संतुलित ठेवण्यास मोठी मदत होणार आहे.

समृद्ध गाव स्पर्धेतील रब्बी हंगामाचे नियोजन करण्यासाठी विहिरीच्या पातळीचे मोजमाप अतिशय महत्त्वाचे असते. यासाठी पाणी फाउंडेशनकडून गावागावांत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. प्रशिक्षण घेतलेले जलमित्र गावातील निवडक विहिरींचे मोजमाप करीत आहेत. मिनी स्पर्धा टप्पा दोनसाठी रब्बी पिकाचे नियोजन महत्त्वाचे असून. गावात किती मिलिमीटर पाऊस पडला त्यानुसार उपलब्ध पाण्यावर पिकाचे नियोजन गावांना करायचे आहे त्यासाठी विहिरीमध्ये सर्वोच्च पाण्याची पातळी, सध्याची पाण्याची पातळी, विहिरीची खोली इत्यादी मोजमाप गावागावांत सुरू आहे.

आतापर्यंत नांदूर पठार, पिंपरी पठार, डोंगरवाडी, पिंपरी जलसेन, कळमकरवाडी, सुलतानपूर, कर्जुले हर्या, पुणेवाडी या गावांनी विहीर मोजमाप केले असून स्पर्धेतील इतरही गावे लवकरच नियोजन करत आहेत. पाणी फाउंडेशनच्या वतीने जलसंधारणाचे विविध उपक्रम राबवले जातात. माथा ते बांधा पाणी अडवणे पाणी जिरवणे. गावातील पाणी गावातच अडवणे. पाणीदार गाव योजना असे म्हत्वाचे उपक्रम हाती घेतले जातात.

पडलेल्या पावसाचे मोजमाप करून उपलब्ध पाण्याचे हंगाम व पिकासाठी नियोजन करता यावे म्हणून आता पाणी फाउंडेशनचे जलदूत निवडलेल्या गावातील विहिरीच्या पाण्याचे मोजमाप करत आहेत . पाणी फाउंडेशनच्या या सूत्रबध्द अखिव रेखिव कामामुळे शेतकर्‍यांना आपल्या पीकपाण्याचे नियोजन करण्यास मोठी मदत होणार आहे

- अभिजीत गोडसे, पाणी फाउंडेशन, तालुका समन्वयक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com