रब्बीच्या पेरण्यांनी ओलांडला सहा लाखांचा टप्पा

कांदा लागवड सव्वा लाख हेक्टरांच्या पुढे
रब्बीच्या पेरण्यांनी ओलांडला सहा लाखांचा टप्पा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मागील 15 दिवसांपासून थंडीचा (Cold) वाढलेला कडाका यामुळे रब्बी हंगामातील पिकांना (Rabbi Season Crops) पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे हंगामातील पेरणी आकडेवारी वाढतांना दिसत आहे. चालू आठवड्यात रब्बी हंगामाच्या पेरणीचा (Rabbi Season) आकडा हा 6 लाख हेक्टरच्या पुढे पोहचला आहे. यात कांदा लागवड (Onion Planting) देखील विक्रमाकडे सरकत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लाख 28 हजार हेक्टरवर शेतकर्‍यांनी कांदा लागवड (Onion Planting) केलेली आहे.

यंदा परतीच्या पावसाच्या दणक्यामुळे शेवटच्या टप्प्यात धोधो पाऊस झाला. यामुळे ज्वारीच्या नियोजित पेरणी कालावधीत पेरण्या होवू शकल्या नाही. मात्र, या वर्षी जिल्ह्याच्या उत्तर आणि दक्षिण भागात पाण्याची टंचाई (Water scarcity) नसल्याने शेतकर्‍यांनी उशीरा देखील ज्वारीच्या पेरण्या केल्या. जिल्ह्यात 1 लाख 84 हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी (Sorghum Sowing) झालेली असून त्याची टक्केवारी ही 39 टक्के आहे. मात्र, मागील आठवड्याच्या तुलनेत ज्वारीच्या पेरणी (Sorghum Sowing) क्षेत्रात वाढ झालेली दिसत नाही. थंडीचा कडका वाढल्याने गहू पिकासाठी (Wheat Crops) पोषक वातावरण तयार झाले असून यामुळे कृषी विभागाच्या नियोजनापेक्षा अधिक 116 टक्के क्षेत्रावर गव्हाची पेरणी झालेली आहे.

यात 56 हजार 863 हेक्टर सरासरी क्षेत्र प्रस्तावित केलेले असतांनाही यंदा 66 हजार हेक्टरच्या जवळपास गव्हाची पेरणी झालेली आहे. तर दुसरीकडे हरभर पिकाच्या पेरणीला काहीसा बे्रक लागल्याचे चित्र आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत जिल्ह्यात हरभरा पिकाच्या पेरणीत अवघी चार टक्केच वाढ झालेली आहे. थंडीचे पोषक वातावरण असतांनाही आणि 1 लाख 53 हजार 627 हरभरा पिकाचे सरासरी क्षेत्र असतांना आतापर्यंत 75 हजार 329 हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी झालेली असून त्याची टक्केवारी 49 टक्के आहे.

विशेष म्हणजे गेल्या महिनाभरापासून प्रत्येक आठवड्या कांदा लागवडीचे क्षेत्रात वाढ होतांना दिसत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात कांदा लागवडीचे क्षेत्रात आठ हजारांची झालेली आहे. यामुळे कांदा लागवडीचे क्षेत्र हे 1 लाख 28 हजार 716 हेक्टर झालेले आहे. जिल्ह्यात अनेक भागात कांदा पिकावर रोगाचा प्रार्दभाव दिसत आहे. कांदा पिक हे करपतांना दिसत असून अनेक ठिकाणी कांद्याच्या पातेने माना टाकलेल्या आहेत.

पेरणी हेक्टरमध्ये कंसात टक्केवारी

ज्वारी 1 लाख 84 हजार 363 (39 टक्के), गहू 65 हजार 990 (116 टक्के), मका 18 हजार 856 (52 टक्के), हरभरा 75 हजार 329 (45 टक्के), करडई 62 (10 टक्के), ऊस लागवड 54 हजार 802 (53 टक्के), चारा पिके 56 हजार 875, कांदा 1 हजार 28 हजार 716, बटाटा 286, टोमॅटो 703, भाजीपाला पिके 9 हजार 896, मसाला पिके 178, औषधी, सुगंधी वनस्पती 25, फुलपिके 709 आणि फळपिके 3 हजार 495 हेक्टरवर पेरणी अथवा लागवड झालेली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com