महिला बालकल्याणसाठी बोरुडे, चोपडा यांचे अर्ज

महिला बालकल्याणसाठी बोरुडे, चोपडा यांचे अर्ज

अहमदनगर (प्रतिनिधी)

महापालिकेच्या (AMC) बहुचर्चित महिला बालकल्याण समितीच्या (Women and Child Welfare Committee) सभापती व उपसभापती पदासाठी अनुक्रमे सेनेच्या (Shivsena) पुष्पाताई बोरुडे (Pushpatai Borude) व राष्ट्रवादीकडून (NCP) मीनाताई चोपडा (Meenatai Chopra) यांनी उमेदवारी दाखल केली.

महापालिकेच्या (Ahmednagar Municipal Corporation) राजकीय वर्तुळात ही निवड प्रतिष्ठेची झाली आहे. सोमवारी शिवसेनेकडून महिला बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी पुष्पाताई बोरुडे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांना सूचक नगरसेविका सुवर्णा गेंनप्पा, नगरसेविका सुरेख कदम व अनुमोदन कमळ सप्रे, शांताबाई शिंदे आहेत. तर राष्ट्रवादीकडून उपसभापती पदासाठी मीनाताई चोपडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सूचक म्हणून नगरसेविका दीपालीताई बारस्कर व अनुमोदक म्हणून नगरसेविका शोभाताई बोरकर आहेत.

यावेळी महापौर रोहिनीताई शेंडगे, नगरसेविका शीतलताई जगताप, नगरसेविका दीपालीताई बारस्कर, नगरसेविका शोभाताई बोरकर, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, जेष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर सुरेख कदम, माजी महापौर शीलाताई शिंदे, संभाजी कदम, नगरसेवक सचिन शिंदे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक गणेश कवडे, नगरसेवक शाम नळकांडे, पवार माजी नगरसेवक संजय चोपडा, दगडू मामा पवार, नगरसेवक रामदास आंधळे, बाळासाहेब बारस्कर, दत्ता पाटील सप्रे, आशाताई निंबाळकर, स्मिता अष्टेकर, अरुणा गोयल, सुषमाताई पाडोळे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com