अहिल्यादेवींचा पुतळा स्वतंत्र जागेतच बसवावा

अन्यथा न्यायालयात जाणार; सकल धनगर समाजाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
अहिल्यादेवींचा पुतळा स्वतंत्र जागेतच बसवावा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरात दोन महापुरुषांमध्ये अहिल्यादेवींचा पुतळा (Statue of Ahilya Devi) बसवू नये, तो स्वतंत्र जागेत बसवावा, अशी मागणी (Demand) सकल धनगर समाजाच्यावतीने (Dhangar socitey) जिल्हाधिकारी (Collector) यांना नुकतेच निवेदन देवून करण्यात आली. दरम्यान हा पुतळा स्वतंत्र जागेत बसविण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचे सकल धनगर समाजाचे बाळासाहेब गोराणे, अ‍ॅड. रवींद्र हाळनोर, निलेश गोराणे, संजय वडितके यांनी सांगितले.

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपूर शहरात (Shrirampur City) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilya Devi Holkar) यांचा पुतळा स्वतंत्र जागेत बसविण्यात यावा, अशी पंधरा वर्षापासून सकल धनगर समाजाची मागणी आहे. याबाबत अनेकदा नगरपालिका प्रशासनाला लेखी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. इ. स. पूर्व काळातील चंद्रगुप्त मौर्यापासून धनगर समाजाला राज घराण्याचा इतिहास आहे. होळकर राजांनी मराठा साम्राज्याच्या उभारणीकरिता भरीव योगदान दिले आहे, हे समाज विसरलेला नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य फक्त धनगर समाजापुराते मर्यादित नसून सर्व समाजाकरिता अविरत सुरु होते.

श्रीरामपूर नगरपालिकेने सन 2009 मध्ये त्यांचा पुतळा बसविण्याचा निर्णय केला होता. तेव्हा दोन महापुरुषांमध्ये अहिल्यादेवींचा पुतळा न बसवता स्वतंत्र जागेत बसवावा, अशी मागणी केली असून तो संघर्ष गेल्या 15 वर्षापासून चालू आहे. दि. 28 एप्रिल 2018 रोजी सकल धनगर समाजाच्यावतीने स्वतंत्र पुतळा बसवावा, या मागणीसाठी श्रीरामपूर नगरपालिका येथे आंदोलन करण्यात आले. नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांचेकडे स्वतंत्र पुतळा बसविण्याची आग्रही मागणी सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली. ही मागणी मान्य करून नगराध्यक्षा आदिक यांनी अहिल्यादेवींचा पुतळा दोन महापुरुषांमध्ये न बसविता स्वतंत्र जागेत बसवू, असे जाहीर केले होते.

गेल्या 15 वर्षापासून स्वतंत्र पुतळ्याची मागणी समाज वेळोवेळी करत असल्याने श्रीरामपूर नगरपालिका मिटिंगमध्ये अहिल्यादेवींचा पुतळा बसविण्यासाठी खर्चास मंजुरी दिल्याचे सोशल मिडीयावर व्हायरल झाले. त्यामुळे पुन्हा दोन महापुरुषांमध्ये अहिल्यादेवींचा पुतळा न बसवता स्वतंत्र बसवावा, अशी मागणी सकल धनगर समाजाच्या बैठकीत करण्यात आली. यात कुठलेही राजकारण नसून कोणीही पुतळ्याच्या मुद्यावर राजकारण करू नये, अशी सकल धनगर समाजाची मागणी आहे.

हे निवेदन स्विकारल्यानंतर सर्व कायदेशीर बाबी तपासून तात्काळ कार्यवाही करावी अशी सूचना जिल्हाधिकार्‍यांनी श्रीरामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी यांना निवेदन देतेवेळी सकल धनगर समाजाचे बाळासाहेब गोराणे, अ‍ॅड. रविंद्र हाळनोर, निलेश गोराणे, संजय वडितके आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com