नेवासा : पूनतगाव व सोनई येथे पुन्हा करोना बाधित रुग्ण

Corona
Corona

नेवासा|तालुका वार्ताहर|Newasa

नेवासा तालुक्यातील पूनतगाव येथील पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णाच्या संपर्कातील 25 व्यक्तींच्या घशातील स्त्राव अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामध्ये पुनतगाव येथील दोन जण बाधित आढळले आहे. तर सोनई येथील तीन व्यक्तींना 2 दिवसापूर्वी त्रास होऊ लागल्याने त्यांना नेवासा येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.

त्यांच्या घशातील स्त्राव घेऊन अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून आज शुक्रवार 17 जुलै रोजी सायंकाळी आलेल्या अहवालात सोनई येथील 3 व्यक्ती आणि पूनतगाव 2 व्यक्ती असे तालुक्यात 5 जण करोना बाधित असल्याची माहिती नेवासाचे तहसीलदार रुपेश सुराणा यांनी दिले आहे.

त्यामुळे सोनई येथे रुग्णांची संख्या 19 तर पूनतगाव येथे रुग्णांची संख्या 3 झाली आहे. तर काही दिवसांपूर्वीचे तेलकुडगाव, पूनतगाव तसेच सोनई येथील काही अहवाल बाकी आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com