पुणतांब्याच्या यात्रेत श्रीरामपुरातील महिलेचे गंठण लांबविले; गुन्हा दाखल

पुणतांब्याच्या यात्रेत श्रीरामपुरातील महिलेचे गंठण लांबविले; गुन्हा दाखल

पुणतांबा |प्रतिनिधी| Puntamba

एकादशीनिमित्त पुणतांबा येथे चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या श्रीरामपुरातील महिलेच्या गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मिनीगंठण अज्ञात चोरट्याने लांबवले. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर शहातील काळाई मंदिर रोड, मोरगे वस्ती याठिकाणी राहणार्‍या सौ.मंजुषा राहुल कुमावत (वय 19) ह्या 24 जुलै रोजी दीडच्या सुमारास पुणतांब्यातील चांगदेव महाराज यात्रेनिमित्त दर्शनाकरीता पुणतांबा येथे आल्या होत्या. सौ. मंजुषा व तिचे सासू सासरे हे चांगदेव महाराजांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेऊन जात असताना श्रीरामपुरातील मंजुषाच्या गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मिनीगंठण अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत लांबवले.

याप्रकरणी सौ. मंजुषा राहुल कुमावत यांनी राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 326/2022 प्रमाणे भादंवि कलम 379 अन्वये अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. मंडलिक करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com