पुणतांब्यात पशुवैद्यकीय दवाखान्यात औषधांचा तुटवडा

पशु पालकांना आर्थिक फटका
पुणतांब्यात पशुवैद्यकीय दवाखान्यात औषधांचा तुटवडा
File Photo

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा येथील पशुवैद्यकिय दवाखाना हा शेतकरी पशुधनासाठी अतिशय उपयुक्त ठरत असताना पशुंची औषधांचा गेल्या अनेक महिन्यापासून तीव्र तुटवडा असल्याने शेतकरी शेतमजूर यानां पशुच्या उपचारांसाठी आर्थिक फटका बसत आहे. पशुवैद्याकीय विभागाने औषध साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पशुपालक शेतकर्‍यांनी केली आहेत्र

शेतकरी शेती पुरक व्यावसाय म्हणून अनेक शेतकरी, शेतमजूर पशुपालन करतात. सध्या दुधाला भाव नाही, शिवाय सध्याच्या वातावरणातील बदल ढगाळ हवामान थंडी या कारणानी दूध उत्पादन वाढीवर परिणाम होऊन गायीची दूध देण्याच्या क्षमतेत घट होत आहे. तर अनेक पशु आजारी पडत आहेत. शासनाच्या पशुवैद्यकिय दवाखान्यात औषधांचा साठा कित्येक महिन्यापासून नाही, त्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकरी शेतमजूर यांना पशुवर उपचार करण्यासाठी खाजगी मेडिकलमधून औषधे खरेदी करावे लागत आहे.

त्यामुळे शेतकरी, शेतमजूर यांना आर्थिक फटका बसत आहे. येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने त्वरीत औषधसाठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकरी, शेतमजूर, पशु पालक यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com