पुणतांब्यात राज्य मार्गावर उड्डाणपूल की भुयारी मार्ग या बद्यल संभ्रम?

पुणतांब्यात राज्य मार्गावर उड्डाणपूल की भुयारी मार्ग या बद्यल संभ्रम?

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

सेंट्रल रेल्वेने दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील रेल्वे फाटक बंद करून भुयारी मार्ग करण्याचे काम

सध्या रेल्वे विभागाकडून जोमाने सुरू असताना पुणतांबा येथे उड्डाणपूल की भुयारी मार्ग होणार याबाबत निर्णय नसल्याने व्यावसायिकांसह नागरिकांत संभ्रम दिसत आहे.

कोपरगाव, श्रीरामपूर व्हाया पुणतांबा या राज्यमार्गावर येथे रेल्वे फाटक येत असून या रस्त्यावरील वाहतुकीमध्ये मोठी वाढ झालेली आहे. तसेच दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर सध्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढली असल्याने रेल्वे फाटक वारंवार बंद राहते. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. रेल्वे फाटकाजवळ कोपरगाव-श्रीरामपूर रस्त्याबरोबरच चांगदेव महाराज मंदिर व मातुलठाणकडे जाणारा रस्ता असल्याने फाटक बंद आणि उघडल्यानंतर वाहतुकीस मोठा खोळंबा होतो.

यामुळे वाहनधारकांना विलंबाने मोठा मनःस्ताप सहन करावा लागतो. याठिकाणी उड्डाणपूल होणार म्हणून रेल्वे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे मोजमाप करून जमिनीची खोदाई करून मुरूम किती फुटावर याची तपासणी तीन वर्षांपूर्वी केलेली आहे. मात्र रेल्वे फाटकाच्या पूर्व दिशेला रस्त्यावर येणार्‍या वळणामुळे उड्डाणपुलास अडचण येते म्हणून उड्डाणपुलासाठी जळगाव रस्ता तसेच चांगदेवनगर रस्त्यांची पाहणी करण्यात आली होती.

उड्डाणपुलामुळे स्टेशन रस्त्यावरील दुकानदार विस्थापित होणार आहे. त्यामुळे अनेकांनी निवेदन देऊन भुयारी मार्ग करावा, अशी मागणी केली होती. मात्र या प्रश्नांवर दोन तीन वर्षांत कोणताही तोडगा निघाला नसल्याने याबद्दल केवळ चर्चाच सुरू आहे रेल्वे विभागाने या मार्गावरील रेल्वे फाटक बंद करून भुयारी मार्ग करण्याची कामे जोमाने सुरू आहे चांगदेवनगर येथील भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील जवळपास सर्वच रेल्वे फाटक बंद होऊन भुयारी मार्ग करण्यात आले आहे. पुणतांबा येथील रेल्वे फाटक सुरू असून याठिकाणी रेल्वे फाटक बंद करताना उड्डाणपूल की भुयारी मार्ग होणार याबाबत चर्चा आहे. पुणतांबा परिसर प्रवासी संस्था रेल्वे विभागाशी कायम पत्रव्यवहार करून समस्या मांडत आहे.

पुणतांबा येथे भुयारी मार्ग व्हावा यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रेल्वे विभाग जिल्हाधिकारी बांधकाम विभाग यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून भुयारी मार्गासाठी गेल्या वर्षी रेल्वे विभागाला ना हरकत दाखला दिलेला असून चांगदेवनगर व वाकडी रस्त्यावरही रेल्वे फाटक बंद करून भुयारी मार्ग करावा अशी मागणी केली आहे कोपरगाव श्रीरामपूर रस्त्यांचा चौपदरीकरण करण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे या कामामुळे स्टेशन रस्त्यावरील दुकानदार विस्थापित होण्याची शक्यता आहे त्याआधीच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेत बी, ओ टी तत्वावर व्यापारी संकुल बांधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- डॉ. धनंजय धनवटे, सरपंच पुणतांबा

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com