
पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
पुणतांबा येथील श्रीकृष्णनगर परिसरात राहणार्या दोन कुटुंबात हाणामारी झाली असून परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.
पहिल्या फिर्यादीत विक्रम गायकवाड हे त्यांचे घरासमोरील रोडवर काही इसम आपसात आरडाओरड करीत असल्याने त्यांना समजावुन सांगत असताना रामदास गायकवाड यास फिर्यादी त्यालाचा बोलतो काय असा गैरसमज होवुन रामदास गायकवाड याने लाकडी दांड्याने, विलास रामदास गायकवाड याने लोखंडी गजाने, रतन रामदास गायकवाड, अरुण रामदास गायकवाड यांनी लाथाबुक्क्याने फिर्यादी व त्याचा भाऊ नितीन रमेश गायकवाड यांना मारहाण करुन दुखापत केली.
तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. यावरुन विक्रम गायकवाड यांचे फिर्यादीवरुन आरोपी रामदास गायकवाड, विलास गायकवाड, रतन गायकवाड, अरुण गायकवाड यांच्याविरुद्ध राहाता पोलीस स्टेशन येथे गु. र. नं. 224/2022 भादंवि कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे फिर्याद दाखल केली आहे.
दुसरी फिर्यादी अरुण गायकवाड यांनी दाखल केली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, विक्रम गायकवाड व त्याचा भाऊ नितीन गायकवाड हे फिर्यादीचे घरासमोरल रस्त्यावर येवुन विनाकारण फिर्यादीस घालून पाडून बोलून शिवीगाळ करु लागले. तेव्हा त्यास समजावून सांगण्यासाठी फिर्यादीचे वडिल रामदास गायकवाड हे गेले असता त्याचा राग येवून नितीन गायकवाड याने त्याचे हातातील लाकडी दांड्याने फिर्यादीचे डोक्याला मारुन दुखापत केली. विक्रम गायकवाड, प्रशांत गायकवाड, रमेश गायकवाड यांनी फिर्यादीचे वडील रामदास गायकवाड, भाऊ विलास गायकवाड, रतन गायकवाड यांना लाथाबुक्क्याने मारहाण करुन दुखापत केली आहे.
विक्रम गायकवाड याने आमच्या नादी लागले तर जिवंत सोडणार नाही, अशी जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. या फिर्यादीवरुन गु.र.नं. 225/2022 भादवि कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा रजि दाखल केला आहे. पुढील तपास पो. हे. कॉ. मंडलिक हे करीत आहेत.