
पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व आदेशाने पुणतांबा स्वामी समर्थ सेवा व बाल संस्कार केंद्राच्यावतीने भरपूर पाऊस पडण्यासाठी व वरूण राजाला साकडे घालण्यासाठी श्री स्वामी समर्थ केंद्र पुणतांबा व वाकडी मधील सेवेकर्यांच्या हस्ते गोदावरी नदीचे पूजन करण्यात आले.
गोदामाईची खण-नारळाने ओटी भरण्यात आली. आंब्याचा रस व पुरणपोळीच्या जेवणाचा नैवेद्य दाखवण्यात आला. 108 वेळेस जपमाळ तसेच नावार्णव मंत्र उच्चार करण्यात आले. गायत्री मंत्र तसेच पर्जन्यसुक्त सर्व सेवेकर्यांनी नदीवर पठण केले. चालू वर्षी चांगला पाऊस सर्वत्र पडू दे, नदी ओसंडून वाहू दे, सर्वत्र धनधान्य चांगले पिकू दे, बळीराजा सुखी होऊ दे, असे वरुण राजाला आवाहन करण्यात आले. यावेळी पुणतांबा तसेच वाकडी केंद्रातील स्वामी समर्थ सेवेकरी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.