पुणतांब्यात शालेय प्रांगणात दारूड्यांचा अड्डा

पुणतांब्यात शालेय प्रांगणात दारूड्यांचा अड्डा

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा स्टेशन रोडच्या बाजूला असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पढवित व प्रांगणात दारू पिणार्‍या दारूड्यांनी अड्डा बनविला आहे. त्यामुळे देशी-विदेशी बाटल्यांचा पसारा दररोज शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीस पडत आहे. याची राहाता तालुका पोलीस निरीक्षक यानी दखल घ्यावी अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देणार असल्याचा इशारा पालकांनी दिला आहे.

कोविडच्या महामारीने अनेक महिन्यांपासून बंद असलेले माध्यमिक विद्यालय काही नियम अटीवर सुरू करण्यास शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. या शाळेत गावातील अनेक मुले शिक्षण घेत असून येथे प्राथमिक इ. 1 ली ते 4 थी व माध्यमिकची इ. 5 वी ते 10 व उच्च माध्यमिक इ. 12 वी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी गावातील व परिसरातील वाड्यावस्त्यावरील अनेक मुले येत असतात. गावच्या मुलांना योग्य संस्कार शैक्षणिक जिवनातच होणे आवश्यक असतात.

कमी वयातच योग्य वातावरणात संस्कार झाले तर गावचा शैक्षणिक व सामाजिक विकास होऊन देशाची प्रगती होऊ शकते. परंतु सुसंस्कारीत पिढी घडवण्यासाठी योग्य वातावरण असणे गरजेचे आहे. येथे उलटेच घडत आहे. दररोज सकाळी शालेय पढवित, परिसरात देशी-विदेशी लेबल असलेल्या रिकाम्या बाटल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीस पडतात. त्यामुळे मद्य कोणत्या नावाने असते हे विद्यार्थ्यांना लहान वयातच माहित होते. परिणामी काही विद्यार्थी व्यसनाच्या आहारी पडतात. त्यामुळे गावचे पर्यायाने देशाची हानी होणार आहे.

ही बाब स्थानिक पोलिसांच्या अनेक वेळा निदर्शनास अणून दिले आहे. परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. शालेय परिसरात दारू पिणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. तरच शालेय परिसरात येऊन दारू पिणार्‍या वाईट वृत्तीला आळा बसेल. यासाठी राहाता तालुका पोलीस निरीक्षक यांनी यांची तातडीने दखल घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करून यावर लवकर कार्यवाही झाली पाहिजे नाही तर याचे निवेदन पालकांसह जाऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात येईल, असा इशारा पालकांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com