पावसामुळे पुणतांबा परिसरातील खरीप पिकांना जीवदान

पावसामुळे पुणतांबा परिसरातील खरीप पिकांना जीवदान

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

परिसरात बुधवारी रात्री पडलेल्या पावसामुळे सोयाबीन, मका, कपाशीसह सर्व खरीप पिकांना जीवदान मिळाल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.

गेल्या 17 दिवसापासून परिसरात पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप पिके पाण्यावर आली होती. अनेक ठिकाणी तर सोयाबीनसह अनेक पिके सुकू लागली होती. त्यामुळे शेतकरी वर्गाचे वरुण राजाकडे लक्ष लागले होते. अखेर बुधवारी रात्री 8 वाजेच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली रात्री 12 वाजेच्या दरम्यान पावसाचा जोर वाढला दोन तास मुरुळधार पाऊस पडला. परिसरात सरासरी दोन ते अडीच इंच पावसाची नोंद झाली.

आतापर्यंत चांगदेवनगर येथील शेती महामंडळाच्या मळ्यावर 14 इंच पावसाची नोंद झाली आहे. बुधवार रात्रीच्या पावसामुळे परिसरातील ओढे नाले यांना बर्‍यापैकी पाणी आले आहे .तसेच खरीप पिकांना जीवदान मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. पावसामुळे काही ठिकाणी ज्यादा वाढलेली सोयाबीनची पिके आडवी पडली आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com