पुणतांबा रेल्वे स्टेशनची स्टोअर रुम खाक

आगीच्यावेळी एक्सप्रेस उभी होती, मोठा अनर्थ टळला
पुणतांबा रेल्वे स्टेशनची स्टोअर रुम खाक

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा जंक्शन रेल्वे स्थानक स्टोअर रूम आग लागल्याने आय ओडबल्यूचे जुने लाकडी सामान जळून खाक झाले आहे. याच वेळी रेल्वे प्रशासनाने पुणतांबा सेक्शनवर ब्लॉक घेतला होता. याच कामामुळे लखनौ-पुणे ही एक्सप्रेस थांबलेली होती जर आगीची तिव्रता वाढली असती तर दुर्दैवी घटना घडली असती, पण सुदैवाने काही घडले नाही आग वेळीच आटोक्यात आली

पुणतांबा (जं) रेल्वे स्थानकावरील काही बांधकाम हे ब्रिटीशकालीन आहे. काही नवीन बांधकाम झालेले असून विविध दुरुस्ती करताना निघालेले टाकाऊ लाकडी व इतर सामान स्टोअर रूममध्ये ठेवण्यात येते. याच रुमला अचानक आग लागली होती. दुपारी तीव्र उन्हाच्या वेळेत दोन ते तीनच्या दरम्यान आग लागली होती

रेल्वे स्टेशनच्या बाहेर अनेक वर्षापूर्वीचा हा स्टोअर रूम असून यात आयओडबल्यूचे अनेक वर्षाचे रेल्वेचे जुनी सागवनी लाकडे होती. पेटलेल्या लाकडातून अग्नीज्वालांनी उग्र रूप धारण केले. याच वेळी धुराचेही लोट आकाशात झेपावत होते. पुढे काय होणार हे पाहून घटनास्थळी उपस्थितीत असलेले रेल्वे कर्मचार्‍यांसह नागरिक भयभित झाले होते.

दुपारी पुणतांबा रेल्वे सेक्शनवर कामा करिता ब्लॉक घेतलेला होता. याच वेळी लखनौ-पुणे एक्सप्रेस गाडी पुणतांबा ( जं.) रेल्वे स्थानकावर उभी होती. पण लागलेल्या आगीची तिव्रता लक्षात येताच या एक्सप्रेसला पुढे सोडण्याची तत्परता दाखवली .त्यामुळे अनर्थ टळला. रेल्वे स्टेशन वरील यंत्रणा व मनुष्यबळ यामुळे रेल्वे स्टेशन बाहेरील मारुती मंदिराच्या परिसरातील कामासाठी पाण्याचा टँकर उभा होता. स्टेशन मास्तर बिस्वास यांच्या विनंती वरून सदर टँकरचे पाण्याने रेल्वे कर्मचारी व परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने ही आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आग आटोक्यात येत असतानाच राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर येथील अग्निशमन गाड्या दाखल झाल्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली.

आग कशामुळे लागली आणि आगीत किती नुकसान झाले हे सांगणे कठीण असल्याचे ड्युटी स्टेशन मास्तर डी. के. बिस्वास यांनी सांगितले. रेल्वे स्टेशनच्या मुख्य इमारत पूर्णपणे सुरक्षीत आहे हे सांगून सदर माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना कळविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.