पुणतांबा पोलिसांनी कापूस चोर रंगेहाथ पकडला

पुणतांबा पोलिसांनी कापूस चोर रंगेहाथ पकडला

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

स्टेशन रोडलगत असलेल्या कापूस खरेदी केंद्रात साठविलेला कापूस चोरतांना पुणतांबा पोलिसांनी एका चोरट्याला जेरबंद केले आहे. मंगळवारी रात्री एक वाजेच्या दरम्यान पोलीस गस्त घालत असताना स्टेशन रोडवरील विष्णू भाऊसाहेब डोखे यांच्या कापूस खरेदी केंद्राच्या दुकानात काही तरी हालचाल असल्याचे व काही संशयास्पद व्यक्ती हालचाल करत असल्याचे लक्षात येताच पोलीस तातडीने घटनास्थळी थांबले ही बाब लक्षात येताच चोरट्यानी पळ काढला त्यातील एका जणाला मोठ्या शिताफीने अटक करण्यात पोलीसांना यश आले.

आरोपी पुणतांब्यातीलच असून चोरट्यांनी नेहमीप्रमाणे दुकानाचा पत्रा खोलून आतील कापूस गोण्या भरून चोरून नेण्याचा प्रयत्न होता. मात्र पोलीसांच्या सतर्कतेमुळे तो प्रयत्न फसला. पुणतांबा गावात 10 वर्षापासून स्टेशनरोडवर सातत्याने व्यापायांची दुकाने फोडून चोर्‍या झालेल्या आहेत. विशेष म्हणजे एकाही चोरीचा तपास लागलेला नाही आता पोलिसांनी चोर जेरबंद केल्यामुळे अनेक चोर्‍याचा तपास लागण्याची शक्यता आहे. कापूस व्यापारी विष्णू डोखे यांनी 64 हजार रुपये किमतीचा 8 क्विंटल कापूस चोरीस गेल्याची राहाता पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. पुढील तपास पुणतांबा पोलीस स्टेशनचे अशोक झिने व त्यांचे सहकारी करत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com