शेतकर्‍यांंचे प्रश्न मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या निर्दशनास आणून देणार- ना. थोरात

राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकर्‍यांनी कांदे, द्राक्ष व फळांचे केले मोफत वाटप || पुणतांब्यात धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस
शेतकर्‍यांंचे प्रश्न मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या निर्दशनास आणून देणार- ना. थोरात

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा (Puntamba) येथील शेतकर्‍यांनी (Farmer) आपल्या विविध मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर (Grampanchayat Office) सुरु केलेल्या धरणे आंदोलनाच्या (Movement) दुसर्‍या दिवशी आज (गुरूवारी) राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state President Nana Patole) यांनी दुपारी 3.30 वाजता भेट दिली. शिर्डी (Shirdi) येथे काँग्रेस आय पक्षाचे दोन दिवसीय नवसंकल्प अधिवेशन सुरु होते. ह्या अधिवेशनातून त्यांनी काही वेळ काढून पुणतांबा (Puntamba) येथील शेतकरी आंदोलनाला भेट दिली. श्री. पटोले (Congress state President Nana Patole) यांनी भारत हा कृषी प्रधान देश आहे. त्यामुळे आम्ही शेतकर्‍यांचे प्रश्न सातत्याने मांडत असतो. पुणतांबा (Puntamba) येथील शेतकर्‍यांचे प्रश्न मंत्री मंडळाच्या बैठकीत मांडण्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच युवकांना जास्तीत जास्त रोजगार उपलबध करून देणार असल्याची ग्वाही दिली. महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी मी एक शेतकरी तसेच राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून ह्या आंदोलनास भेट देण्यासाठी आलो आहे. शेतकर्‍याचे प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच दूग्ध विकास मंत्र्यांच्या निर्दशनास आणून देणार आहे. महाविकास आघाडीने जिल्हा बँकेला 1500 कोटी दिले आहेत. जे शेतकरी नियमित कर्जफेड करत असेल त्यांच्या खात्यावर अनुदानाची (Grant) रक्कम लवकर जमा होईल.

पुणतांब्यातील (Puntamba) शेतकर्‍यांच्या आंदोलनात निश्चीत योग्य मार्ग काढू कारण खंडकरी शेतकर्‍यांचा तसेच समृद्धी महामार्गातील जमिनीच्या प्रश्नाबाबत आपण योग्य मार्ग काढलेला आहे. असेही त्यांनी आर्वजून स्पष्ट केले. आज (गुरूवारी) धरणे आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी पुणतांब्यातील शेतकर्‍यांनी मशाल पेटून आंदोलनाची सुरुवात केली. यावेळी झालेल्या सभेत नाशिक जिल्हा द्राक्ष संघाचे अध्यक्ष रविंद्र निमसे तसेच रविंद्र भोसले यांनी द्राक्ष पिकांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे अडचणीत असलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांच्या व्यथा मांडल्या तसेच पुणतांबा येथील धरणे आंदोलनाला जाहिर पाठिंबा दिला.

निफाड येथील शेतकरी योगेश रायते यांनीही शेतकर्‍यांच्या प्रश्नावर तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी शेवगाव येथील चंद्रकांत लबडे तसेच शेतकरी संघटनेचे कोल्हापूर येथील उपाध्यक्ष बाळासाहेब निकतयांनीही मनोगत व्यक्त करून आंदोलनास पाठिंबा दिला शेतकर्‍यांच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी गुरूवारी धरणे आंदोलनाच्या ठिकाणी राजेंद्र लोखंडे ह्या शेतकर्‍यांने गरीबांसाठी मोफत द्राक्षाचे वाटप केले. तसेच शेतकर्‍यांनी आणलेले कांदे व फळांचे मोफत वाटप करून आपला रोष व्यक्त केला. सरकारने पाच जूनपर्यंत मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. यावेळी सरपंच डॉ धनजंय धनवटे, सुहास वहाडणे, बाळासाहेब चव्हाण, सुभाष वहाडणे, सुभाष कुलकर्णी सह अनेक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com