
पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
परिसरातील 11 गावामध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक आहे. सर्वच ऊस कारखाने तोडून नेण्याची शक्यता कमी आहे. म्हणून परिसरात गुर्हाळे सुरु करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी चांगदेवनगर परिसरातील शेतकर्यांनी आ. डॉ. सुधीर तांबे यांच्याकडे केली.
आ. तांबे यांनी चांगदेवनगर परिसरातील सांबारे वस्ती येथे भेट दिली. त्यावेळी शेतकर्यांनी ही मागणी केली. यावेळी दादा सांबारे, विष्णू सांबारे, अप्पा सांबारे, पंडित सांबारे, शिवाजी सांबारे, मधु पेटकर, एकनाथ तळेकर, अमोल थोरात, राजू शिरसाठ, संदीप देसले उपस्थित होते. दादा सांबारे यांनी परिसरात ऊस उत्पादक शेतकर्यांची साखर कारखान्याकडून मोठ्या प्रमाणात अडवणूक केली जात आहे.
वेळेवर ऊस तोडी मिळत नाही. ऊस तोडीसाठी ऊस तोडणी कामगाराकडून मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली जाते. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होत आहे. ऊस शिल्लक राहणारच आहे. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी परिसरात शेतकर्यांची गुर्हाळे सुरु होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी शेतकरी वर्गाला मदत करण्याची गरज आहे, असेही श्री. सांबारे यांनी स्पष्ट केले.
इतर शेतकर्यांनीही पुणतांबा परिसरात उसाचे क्षेत्र वाढले आहे. ऊस तोडणी वेळेकर मिळत नसल्यामुळे शेतकरी या पिकाऐवजी दुसर्या पिकाकडे वळेल, अशी भिती व्यक्त केली आ. तांबे यांनी परिसरातील विविध प्रलंबित प्रश्नात लक्ष घालण्याची मागणीही उपस्थित शेतकर्यांनी केली.