पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

चालू वर्षी गोदावरी नदीला 21 जुलै 2020 पासून पाणी वाहत असल्यामुळे व आजही येथील कोल्हापूर पध्दतीच्या वसंत बंधार्यात पुरेसे पाणी अडविण्यात आलेले आहे.

त्यामुळे गोदावरी नदीपात्रात विविध प्रकारचे मासे मुबलक प्रमाणात मिळत आहेत. गोड्या पाण्यातील ताजे मासे योग्य भावात मिळत असल्यामुळे पुणतांबा येथे दुपारी चार वाजेनंतर स्टेशन रोडलगत असलेल्या मच्छीमार्केटमध्ये मासे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड लागली आहे.

गेल्या 40 वर्षात प्रथमच गोदावरी नदीपात्रात फेबुवारी महिन्यापर्यंत पाणी आहे. गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असताना नाशिक जिल्ह्यातील धरणातून तसेच जायकवाडी जलाशयातून मोठ्या प्रमाणात मासे नदी प्रवाहात आली आहेत. त्यामुळे सध्या येथे मिसूळ, रावस, रवू, कटला, मिरगर चिलेपी, आमली मोयदा जातीचे मासे तसेच काही प्रमाणात झिंगे सुध्दा मिळत आहेत.

नदीपात्रात मासे पकडण्यासाठी 50 ते 60 जण जाळे टाकून मासे पकडत असतात. त्यावर 70 ते 75 कुटूंबाचा उदरनिर्वाह सुरु आहे. श्रीरामपूर व कोपरगावच्या तुलनेने पुणतांबा येथे मासे स्वस्त दराने मिळतात, असा ग्राहकांचा अनुभव आहे. पुणतांब्यात अवघ्या 100 ते 110 प्रति किलो दराने चिले पी जातीचे मासे मिळतात.

त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे येथील मत्स व्यवसाय करणारे सोमनाथ लहिरे यांनी सांगितले. मासेमारीमुळे पुणतांब्यातील अनेकांना रोजगार व कुटूबांला आधार मिळत असल्याचेऊनेकांनी स्पष्ट केले आहे विशेष म्हणजे परिसरातील इतर अनेक बंधार्यात पाणी असल्यामुळे तेथेही मासेमारीला चांगला वाव असल्यामुळे मत्स व्यवसाय करणार्या मध्ये समाधानाचे वातावरण आहे.