
पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
परिसरातील ऊस उत्पादक (Sugarcane Growers) शेतकर्यांना उसाची नोंद करूनही वेळेवर ऊस तोड मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग हतबल (Farmers are Helpless) झालेला आहे.
गोदावरी नदीच्या (Godavari River) पट्यात असलेल्या पुणतांबा परिसरात उसाचे क्षेत्र वाढलेले आहे. परिसरातील शेतकरी गणेश कारखाना (Ganesh Factory), कोळपेवाडी (Kolpewadi) तसेच संजीवनी कारखाना (Sanjeevani Factory) अशा तीनही कारखान्याकडे उसाच्या नोंदी करत असतात. चालू वर्षी साखर कारखाने बाहेरच्या कार्यक्षेत्रातून ज्यादा ऊस आणत असल्यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना वेळेवर ऊस तोड मिळत नाही. विशेष म्हणजे ऊस तोडणी कामगारही ऊस तोडीचे प्रति एकरी 3 ते 5 हजार रुपयाची मागणी करत आहे. ते अधिकारी वर्गाचे सुद्धा ऐकत नाही.
चांगदेवनगर (Changdevnagar) येथील भाऊसाहेब केरे या शेतकर्याचा साडेचार एकर ऊस दोन दिवसापूर्वी जळाला. त्यांनी कोळपेवाडी कारखान्याकडे उसाची रितसर नोंदणी केली होती. वारंवार विनंती करूनही संबंधित कारखान्याने ऊस नेला नाही. शेवटी दुसर्या कारखान्याने ऊस नेला. कारखान्याकड्न ही ऊस उत्पादक शेतकर्याची अडवणूक केली जात असल्याचे श्री. केरे यांनी स्पष्ट केले आहे.
परिसरात अद्यापही अंदाजे चारशे एकरापेक्षा जास्त क्षेत्र उभे आहे बर्याच ठिकाणी ऊस आडवा पडला आहे तर उसाला तुरे सुद्धा आल्यामुळे ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परिसरातील 11 गावातील शेतकरी वर्गाला कोणी वाली राहिला नसून त्याची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे.