करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पुणतांब्यात दशक्रिया विधी बंद

करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पुणतांब्यात दशक्रिया विधी बंद

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

मयत व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांकडून नियमावलीचे कोणतेही पालन होत नसल्याने पुणतांब्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याची दखल घेऊन येथे होणारे दशक्रिया विधी तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे. याबाबतचे पत्रक पुणतांबा करोना सुरक्षा समितीने जारी केले आहे.

सध्या करोनामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे मृत्यू होत आहेत. पुणतांबा तीर्थस्थळ असल्याने सदर मयत व्यक्तींचे दशक्रिया विधी व इतर धार्मिक कार्यक्रम केले जात आहेत. मयत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य करोना विषयक नियमावलीचे पालन करीत नाहीत. त्यामुळे पुणतांब्यातील अनेक नागरिकांना संसर्ग होत आहे.

त्यामुळे या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. या नियमाचे कोणी उल्लंघन केल्यास तसेच हे विधी करणारे पुरोहित यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे तसेच दशक्रिया विधीसाठी आलेले नातेवाईकांकडून दहा हजारांचा दंड वसूल करण्यात येईल असे या पत्रकात नमूद करण्यात आले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com